Share

मोठी बातमी : विशाखापट्टणम येथे वायू गळती, 8 जण दगावले तर 200 जणांची प्रकृती गंभीर

Published On: 

विशाखापट्टणम : आंध्र प्रदेशातील विशाखापट्टणम येथील आर आर वेंकटपुरम गावात एलजी पॉलिमर या फार्मा कंपनीतून वायू गळती झाली आहे. सकाळी ही घटना घडली असून यामध्ये बालकासह आठ जणांचा मृत्यू झाला आहे.

गॅॅस गळतीमुळे विशाखापट्टणम हादरलं आहे. धक्कादायक म्हणजे या गॅस गळतीमुळे 5000 हून अधिक लोक आणि प्राण्यांची प्रकृती बिघडली आहे. तीन जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्यानं त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलं आहे. तर 200 जणांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती मिळत आहे. हा गॅस जवळपास 3 किलोमीटरपर्यंत पसरत गेला.

5 गावं पूर्णपणे रिकामी करण्यात आली आहेत. या गॅस गळतीचा फटका 9 गावांना बसल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुर्घटनेची माहिती मिळताच पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

डोळ्यांची जळजळ, डोकेदुखी, उलटी आणि श्वास घेण्यास अडचण असा त्रास नागरिकांना होत आहे. एनडीआरएफ आणि एसडीआरएफची पथकं घटनास्थळी पोहोचली आहेत. नागरिकांना रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे. तसंच लोकांनी सुरक्षित ठिकाणी जावं असं आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!