मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या या संसर्गाने देशात आरोग्य आणीबाणीची परिस्थीती निर्माण झाली आहे. कोरोनाच्या या संसर्गामुळे अनेक ठिकाणी वैद्यकीय सेवेचा तुटवडा निर्माण होत आहे.
खरतर सध्या महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार केला आहे. परंतु सध्यस्थिती पाहता राज्यातील ही कोरोनाची लाट ओसरताना दिसत आहे. पण अनेक तज्ञ मंडळींकडून आता तिसऱ्या लाटेची शक्यता वर्तवली जात आहे. कोरोनाची तिसरी लाट ऑगस्ट ते सप्टेंबर महिन्यात येऊ शकते असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. या लाटेत लहान मुलांना कोरोनाचा अधिक धोका असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज बालरोग तज्ज्ञांच्या टास्क फोर्ससोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. यावेळी लहान मुलांना कोरोनापासून होणाऱ्या संभाव्य धोक्याबाबत मुख्यमंत्र्यांनी डॉक्टरांशी चर्चा केली आणि राज्य सरकार करत असलेल्या तयारीची सविस्तर माहिती दिली.
यावेळी ते बोलताना म्हणाले कि, ‘तिसरी लाट येईल का आणि आली तर लहान मुलांना किती संसर्गग्रस्त करेल याविषयी सध्या अंदाज आहेत पण आपण सावध राहिले पाहिजे. पहिल्या लाटेत ज्येष्ठ नागरिक आणि दुसऱ्या लाटेत तरुणांना कोरोनाचा संसर्ग झाला. संसर्गाचं वय खाली आलंय. त्यामुळे तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्ग होईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. गेल्या रविवारीच मी राज्यातील सर्व डॉक्टर्सशी बोललो.
लहान मुलांच्या बाबतीत तर आपला डॉक्टर्सवर अगदी अंधविश्वास असतो असे म्हटले तर चुकीचे होणार नाही. डॉक्टर जे सांगतील ते उपचार आपण आपल्या लहान मुलांच्या बाबतीत आपण करतो. रोगापेक्षा इलाज भयानक होऊ नये याची मात्र काळजी घ्या, काय करावे आणि काय करू नये ते नेमके आपल्या डॉक्टर्सकडून समजून घ्या. डॉक्टर्सनी देखील मुलांच्या पालकांना अस्वस्थ नाही तर आश्वस्त करावे , योग्य मार्गदर्शन करावे,’ असा सल्ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी डॉक्टरांना दिला आहे.
दरम्यान पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागातील प्रमुख रुग्णालयांमध्ये लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष राखीव ठेवण्याच्या सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिल्या आहेत. पुण्यातील कौन्सिल हॉल येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठकीत घेण्यात आली होती. त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या आहेत.
महत्वाच्या बातम्या
- मलायका सोबतच्या अफेयरवर अर्जून कपुरने पहिल्यांदाच सोडले मौन, म्हणाला…
- वाढदिवशी तेजस्विनीनं केली नव्या वाटचालीची सुरुवात ; केली मोठी घोषणा
- लुटेरी दुल्हन! सोनू शिंदे युवतीचा कारनामा, चक्क १३ लग्न करत १३ मुलांना लाखोंना गंडवले
- वडिलांच्या मृत्युला रुग्णालयच जबाबदार असल्याचा संभावना सेठने केला आरोप
- न्यूझीलंडचा ‘हा’ फलंदाज अश्विनला सामोरे जाण्याची अशी करतोय तयारी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
