Share

मुख्यमंत्री येण्याच्या पूर्वसंध्येला जलयोजनेच्या कामाला सुरुवात

Published On: 

🕒 1 min read

औरंगाबाद: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नवीन जलवाहिनी योजनेच्या कामाचे भूमिपूजन केल्यानंतर दीड महिन्यांनी अखेर प्रत्यक्षात कामाला प्रारंभ झाला आहे. हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंत्राटदार कंपनीने शहरात गरवारे स्टेडीयम, दिल्लीगेट, टिव्ही सेंटर, शिवाजीनगरसह सहा ठिकाणी जलकुंभ उभारण्याच्या कामाला गुरूवारी (दि.४) सुरूवात करण्यात आली. तसेच जायकवाडी ते नक्षत्रवाडीपर्यंत टाकण्यात येणार्‍या मुख्य जलवाहिनीच्या कामाचेही सर्वेक्षण सुरू झाल्याची माहिती महापालिकेचे प्रशासक तथा आयुक्त आस्तिककुमार पांडेय यांनी दिली.

शुक्रवारी (दि.५) शहरासह जिल्ह्यातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे औरंगाबाद दौर्‍यावर येत आहेत. ते शहरात येण्याच्या आदल्या दिवशीच जलयोजनेचे काम सुरू झाल्याने कुतूहल व्यक्‍त केले जात आहे. महाविकास आघाडी सरकारने राज्यात सत्तेवर येताच १६८० कोटी रुपयाच्या औरंगाबाद शहराच्या नवीन जलयोजनेला प्रशासकीय मान्यता दिली.

महाराष्ट्र जीवन प्राधिकरण यांच्याकरवी पहिल्या टप्प्यात करण्यात येणार्‍या १३०८ कोटी रुपयांच्या कामासाठी निविदा प्रक्रिया राबवून हैदराबाद येथील जीव्हीपीआर कंपनीची निविदा अंतीम करण्यात आली. त्यासाठी 1437 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करुन त्यास मंजूरी दिली आहे.

नुकतीच दोन दिवसांपूर्वी कंत्राटदाराने बँक गॅरंटी भरली आणि आज गुरूवारी सकाळी कंत्राटदारास वर्कऑर्डर देण्यात आली. तोच कंपनीने आधीपासूनच तयारी केलेली असल्याने गुरूवारी प्रत्यक्ष कामाला सुरूवात केली. कंत्राटदाराने गरवारे स्टेडीयम, टिव्ही सेंटर, दिल्लीगेट, शिवाजीनगरसह सहा ठिकाणी जलकुंभ उभारणीच्या कामाला सुरूवात केली आहे. प्रारंभी १५ ठिकाणी जलकुंबांधण्याचे नियोजन केले आहे. तसेच नक्षत्रवाडी ते जायकवाडीपर्यंतच्या मुख्य जलवाहिनीच्या कामासाठी सर्वेक्षण करण्यास टीम कामाला लागली आहे, अशी माहिती आयुक्‍त पांडेय यांनी दिली. आगामी तीन वर्षात या योजनेचे काम पूर्ण केले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

महत्वाच्या बातम्या

 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!