Share

डांबरी रस्त्यांना सेनेचाच विरोध,’रस्ता खराब झाल्यास लोक शिव्या घालतात’-खैरे

Published On: 

औरंगाबाद : शहरातील रस्ते आत्ता कुठे खड्डेमुक्त होत आहेत, अशा परिस्थितीत काही रस्ते डांबरी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाला शिवसेना नेते चंद्रकांत खैरे यांनी प्रखर विरोध केला असून कंत्राटदार डांबरी रस्त्यांची कामे थातूरमातूर करतात. त्यामुळे खड्डे पडतात आणि लोक आम्हाला शिव्या घालतात असा त्रागा त्यांनी व्यक्त केला.

शहरातील सर्वच रस्ते सिमेंटचे असावेत अशी मागणी आपण मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान रस्ते, पाणी, कचरा या महत्त्वाच्या प्रश्नांनी गेल्या दोन वर्षात शिवसेनेला छळले होते. रस्त्यांच्या अवस्थेवरून तर उभ्या महाराष्ट्रात चर्चा झाली. त्यामुळे खड्ड्यांचा प्रश्न शिवसेनेने फारच गंभीरपणे घेतला आहे. डांबरी रस्तांमुळेच खड्ड्यांचा प्रश्न निर्माण होतो.

त्यामुळे यापुढे शहरात डांबरी रस्त्यांना प्रखर विरोध करणार, अशी भूमिका शिवसेनेने घेतल्याचे बोलले जाते. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त शिवसेनेने जय्यत तयारी केली असून महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीने पक्ष बांधणी अधिक बळकट करण्यावर भर देण्यात येत आहे.

विकास कामांच्या पाहणी बरोबरच संघटनात्मक बाबींचीही ठाकरे माहिती घेणार असल्याने पदाधिकाऱ्यांची गुरुवारी (दि.४) महत्त्वाची बैठक होत आहे. याबाबत खैरे म्हणाले, रस्त्यांची कामे वेगात सुरू आहेत. मात्र डांबरी रस्त्यांना आमचा विरोध आहे याबाबत चर्चा करू. शहरातील रस्ते आता खडेमुक्त होत आहे. त्याचबरोबर कचरा, पाण्याचा प्रश्नही जवळपास सुटला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे शहरावर विशेष लक्ष असल्याने निधीची कमतरता मुळीच भासणार नाही असा दावा त्यांनी केला.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!