Share

सासरच्या त्रासाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

Published On: 

औरंगाबाद : सासरच्या लोकांनी वेळोवेळी पैशाची मागणी करून शारीरिक व मानसिक छळास कंटाळून विवाहितेने आत्महत्या केल्याची घटना कन्नड तालुक्यातील भिलदरी येथे बुधवारी सकाळी सहा वाजता उघडकीस आली. पूजा नवलसिंग कायटे (वय २४) असे मयत विवाहितेचे नाव आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वडिलांचे छत्र हरवलेल्या पूजाचा विवाह २०१३ मध्ये भिलदरी येथील नवलसिंग कायटे याच्याशी झाला. पूजाच्या माहेरची परिस्थिती गरिबीची असल्याने मामा इंदल लकवाल यांनी स्वतःची एक एकर जमीन विकून तिचे लग्न थाटामाटात लावून दिले. दीड ते दोन वर्षे सासरच्या लोकांनी व्यवस्थित वागविल्यानंतर शेतात पाईपलाईन टाकण्यासाठी दोन लाख रुपयाची मागणी केली.

परंतु माहेरी गरिबी असल्याने व मामाने पैसे देण्यास असमर्थता दर्शविल्याने सासरच्या लोकांनी पूजाला तिच्या मामाकडे गल्ले बोरगाव येथे आणून घातले होते. सासरच्या लोकांना समजावून सांगितल्याने पूजाला पुन्हा सासरी पाठविण्यात आले. दीड ते दोन वर्षानंतर पती नवलसिंग व दिर अर्जुन कायटे यांनी पुन्हा पीक अप गाडी घेण्यासाठी दोन लाखाची मागणी केली. पैशाची मागणी पूर्ण होत नसल्याने नवरा, सासू, सासरे यांनी शिवीगाळ करून मारहाण करण्यास सुरुवात केली. मामा लकवाल यांनी कसेबसे जमवाजमव करून चाळीस हजार रुपये दिले होते.

मंगळवारी सकाळी अकरा वाजता पूजाने मामा लकवाल यांना फोन करून नवरा, सासू, सासरा, दिर जास्तच त्रास देत असल्याचे सांगितले. दरम्यान पूजाच्या पतीने पिशोर पोलीस ठाण्यात मध्यरात्री बारा वाजता बेपत्ता असल्याची खबर दिली.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!