Share

‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावालावी करू नका; जयंत पाटील कडाडले

Published On: 

अमरावती : काँग्रेसला आता उपमुख्यमंत्री पदाबाबत रस असल्याचे वृत्त विविध माध्यमांनी दिले आहे. हाच मुद्दा पकडून विरोधी पक्षाच्या नेत्यांनी महाविकास आघाडीवर टीकास्त्र सोडलं आहे. तर, भाजप नेते निलेश राणे यांनी काँग्रेसलाही उपमुख्यमंत्रीपद मिळालं पाहिजे असं वक्तव्य केलं आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

‘महाविकास आघाडी सरकारमधील आम्ही तिन्ही पक्ष गुण्यागोविंदाने राज्यकारभार करत आहोत. ‘अ’ची ‘ब’ला आणि ‘ब’ची ‘क’ला लावलावी करणाऱ्यांनी हे उद्योग सोडावेत’ अशा शब्दात जयंत पाटील यांनी विरोधकांना सुनावलं आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने अमरावतीत आले आहेत. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

नाना पटोलेंनी दिला विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा !

विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा सोपवला आहे. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्याकडे पटोले यांनी राजीनामा सोपवल्यानंतर आता झिरवळ यांच्याकडेच हंगामी अध्यक्षपद असणार आहे. यामुळे आता अध्यक्षपद हे कोणत्या पक्षाकडे जाणार हे महत्वाचं ठरणार आहे.

विधानसभा अध्यक्षपदाबाबत शरद पवार यांची प्रतिक्रिया

यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अनौपचारिक प्रतिक्रिया दिली आहे. ‘काँग्रेसमध्ये पक्षांतर्गत दबाव असल्यानं अध्यक्ष बदलाचा निर्णय घेतला गेला. ‘आता नवीन विधानसभा अध्यक्ष ठरवण्यासाठी पुन्हा तिन्ही पक्षांमध्ये चर्चा होणार. अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं ते आता खुलं झाले आहे.’ असं वक्तव्य शरद पवार यांनी केल्यामुळे आता अध्यक्षपद काँग्रेसकडून निसटणार का ? असा प्रश्न निर्माण होत आहे.

महत्वाच्या बातम्या

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
Maharashtra Desha App Faster news updates आणि notifications साठी App इन्स्टॉल करा.
Install
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!