औरंगाबाद : १६८० कोटींच्या जलयोजनेतून १९०० किलोमीटर लांबीचे जलवाहिन्यांचे जाळे टाकले जाणार आहे. त्यासाठी वाहिन्यांच्या मार्गाचे काम केले जात आहे. आजवर १ हजार किलोमीटरचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. त्यामुळे आता जलवाहिनीच्या कामाला लवकरच प्रारंभ होणार आहे. यासाठी ३० किलोमीटर लांबीचे नवीन पाईप नुकतेच आणण्यात आले आहेत. अजून ३० किलोमीटर लांबीचे पाईप आणले जाणार आहेत. नवीन रस्त्यांच्या कामांत हे पाईप रस्त्याखाली टाकले जाणार आहेत.
मागील अनेक वर्षे गाजलेली समांतर जलवाहिनी योजना वादग्रस्त ठरली आणि ती नंतर नागरिकांच्या विरोधामुळे गुंडाळण्यात आली. त्यानंतर १६८० कोटींची जलयोजना राज्य सरकारने मंजूर केली. या योजनेसाठीच्या निधीला दोन महिन्यापूर्वीच राज्य सरकारने मान्यता देत निधीची तरतूद केली. त्यानंतर लगेच या योजनेच्या कामास शहरातून प्रारंभ करण्यात आला आहे. पहिल्य टप्प्यात मुख्य जलवाहीनीचे काम प्राधान्याने केले जाणार आहे.
मात्र ज्या ठिकाणी आता शहरात तत्काळ जलवाहिनीचे काम आवश्यक आहे, अशा ठिकाणी पाईप टाकले जाणार आहे. सोबतच सहा ठिकाणी नवीन जलकुंभ उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. दुसरीकडे जलवाहिन्यांच्या मार्गांचे सर्वेक्षणही कंत्राटदार कंपनीने हाती घेतले आहे. राज्य सरकारच्या निधीतून २३ रस्त्यांची कामे सध्या शहरात सुरू आहे. ही कामे करताना त्याखाली टाकलेल्या जलवाहिनी नंतर बदलाव्या लागतील. त्यामुळे येथे अगोदरच जलवाहिनी टाकून त्यानंतरच रस्त्यांची कामे पूर्ण केली जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.
मुख्य जलवाहनी काम मोठे असून त्यासाठी मोठे पाईप आणले जाणार आहेत. हे पाईप तयार होण्याचा कालावधी नंतर त्यांचे थर्ड पार्टी इंस्पेक्शन करून त्याची गुणवत्ता तपासली जाईल. त्यासाठी किमान तीन महिन्यांचा अवधी लागू शकतो, असे सूत्रांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
- फक्त त्यांची दाढी वाढलीये आणि स्क्रू ढिला झालाय; ममता बॅनर्जींची जहरी टीका
- आता शहरात उरलाय ‘इतकाच’ कोरोना लसींचा साठा…
- आता शहरात उरलाय ‘इतकाच’ कोरोना लसींचा साठा…
- पुण्यात कोरोनाचा कहर : नवीन नियमावली जाहीर, वाचा काय राहणार सुरु काय होणार बंद !
- ‘लॉकडाऊन‘ मध्येही विद्यापीठाच्या परीक्षा होणार
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

