नवी दिल्ली : भारतीय महिले क्रिकेट संघ आयसीसी महीला विश्वचषकाचा आगाज रविवारी ६ मार्च पासून पाकिस्तानविरुद्धच्या सामन्याने करेल. भारतीय महीला संघाची कर्णधार मिताली राज म्हणाली, या मालिकेत आम्ही कोणत्याही संघाला हलक्यात घेणार नाही.
“मिताली एका प्रेस कॉन्फरन्समध्ये बोलताना म्हणाली की, हरमनप्रीत मधल्या फळीत चांगली खेळते. तिची भूमिका महत्वपूर्ण असणार आहे. त्यामुळे तिचे फॉर्ममध्ये असणे खूप गरजेचे आहे. सराव सामन्यामध्ये तिने चांगली फलंदाजी केली आहे. त्यामुळे तिच्या खांद्यावरती संघाची मोठी जबाबदारी असेल. आम्ही मधल्या षटकात जास्त धावा काढण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मागील काही दिवसांपासून ३२ वर्षाची हरमनप्रीत जास्त धावा काढू शकली नाही. परंतु तिने न्यूझीलंडविरुद्धच्या ५ व्या वनडे सामन्यात ६३ धावांची खेळी केली होती. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात १०४ धावांची शतकीय खेळी करून विश्वचषकासाठी आगाज केला आहे.
मिताली पाकिस्तान संघाबद्दल बोलताना म्हणाली की, तो संघ खूप चांगला आहे. त्यामुळे आम्ही त्यांना हलक्यात घेणार नाही. इथे जेवढे ही संघ आहेत. त्यातील कोणाला ही आम्ही हलक्यात घेणार नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक सामना पूर्ण आत्मविश्वासाने खेळणार आहोत.
पुढे ती म्हणाली की, मला वाटते की या विश्वचषकात खेळताना झूलन गोस्वामीचे संघात असणे, आमच्यासाठी चांगले आहे. मागील काही वर्षांपासून ती संघाची मुख्य गोलंदाज बनली आहे. मी जेव्हाही तिला चेंडू दिला त्यावेळी तिने मला विकेट काडून दिली. तिचा अनुभव संघातील युवा गोलंदाजांसाठी खूप महत्वपूर्ण असेल.”
महत्वाच्या बातम्या :
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

