Share

१५ लाख खात्यात जमा होण्यावरून राहुल गांधींची नरेंद्र मोदींवर टीका ; म्हणाले कि…

Published On: 

🕒 1 min read

वाराणसी: सध्या देशात विधानसभा निवडणुकांचा हंगाम चालू आहे. पंजाब,उत्तराखंड आणि गोवा या ३ राज्यात निवडणूका झाल्या आहेत. तर मणिपूर आणि उत्तरप्रदेश या २ राज्यात काही टप्प्यांच्या निवडणूका राहिल्या आहेत. कालच देशाचे प्रधानमंत्री उत्तरप्रदेश विधानसभा निवडणूकीकरता प्रचार करण्यासाठी  वाराणसी शहरात गेले होते. त्यांनी या वेळेज वाराणसी येथील प्रसिद्ध मंदिरात जाऊन देवाचे दर्शन सुद्धा घेतले. या देवदर्शनावरून काँग्रेसचे लोकसभेमधील खासदार राहुल गांधी यांनी नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे.

उत्तरप्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी आज जनतेस संबोधित करत होते. प्रचार सभेत आज बोलताना राहुल गांधी म्हणाले कि, ”प्रधानमंत्र्यांनी २०१४ मध्ये प्रचार करताना काळा पैसा, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणे आणि प्रत्येक भारतीयाच्या खात्यात १५ लाख जमा होतील असे भाष्य केले होते. मात्र आता प्रधानमंत्री विकासाच्या कोणत्याच मुद्द्यावर भाष्य करताना दिसत नाहीत. सध्या ते फक्त धर्माच्या नावे प्रचार करत आहेत.

“मी मृत्यूला सामोरे जाण पसंद करिन, पण मी मतदारांच्या समोर तुमच्या खात्यात १५ लाख रुपये जमा होतील असे खोटे आश्वासन कधीच देणार नाही. भारत देश एक लोकशाही प्रधान देश आहे आणि या देशात सामान्य नागरिक हा सर्वोच्च स्थानी असतो. त्यामुळे मी सामान्य नागरिकांची इज्जत करतो म्हणूनच मी कधीही मतदारांना खोटी आश्वासन देऊन फसवणार नाही” असे देखील राहुल गांधी आज म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!