पुणे : शरद पवार म्हणतात नवाब मालिकांवर कारवाई फक्त राजकीय हेतुने केली जात आहे. ते मुस्लीम आहेत म्हणून त्यांचा दाऊदशी संबंध जोडला जात आहे. माझ्यावरही तसे आरोप करण्यात आले होते. असे बोलत शरद पवारांनी नारायण राणेंना वेगळा न्याय आणि नवाब मालिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्न करत सपष्ट भूमिका मांडली आहे.
नवाब मलीक मुस्लिम असल्यामुळे दाऊद इब्राहिमशी संबंध जोडला जात आहे. मलिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचा जाणूनबुजून छळ केला जात आहे, पण आम्ही त्याविरोधात लढा देऊ. नवाब मलिक यांना अटक झाली म्हणून तुम्ही मंत्रिमंडळातून काढा असे बोलत आहात. मान्य आहे त्यांना अटक झाली परंतु सिंधुदुर्गातील एक जुने सहकारी नारायण राणे यांनाही अटक करण्यात आली होती. त्यांना मंत्रिमंडळातून काढण्यात आले नव्हते. उद्या नरेंद्र मोदी पुण्यात येणार आहेत कदाचित याचा खुलासा करतील असा टोला शरद पवार यांनी केला आहे.
नारायण राणेंना देखील अटक झाली होती, मला आठवत नाही की यांचाही राजीनामा मागितला होता. मग नारायण राणेंना वेगळा न्याय आणि नवाब मालिकांना वेगळा न्याय का? असा प्रश्नही उभा केला आहे.
महत्वाच्या बातम्या –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

