Share

“यांचा सत्तेचा माज जनताच उतरवेल”; नितीन गडकरींचा व्हिडीओ ट्विट करत काँग्रेसची टीका

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडीयो महाराष्ट्र कॉंग्रेसने ट्विट केला आहे. “यांचा माज जनताच उतरवेल” असे कॅप्शन या व्हिडीयोला देण्यात आले आहे. त्याचबरोबर आधी हात जोडायचे नंतर बाप काढायचे, अशी टिका ही केली आहे. हा व्हिडीयो युझर्सकडून मोठ्या प्रमाणावर रिट्विट करण्यात येत आहे. त्यामुळे व्हिडीयोत केलेल्या वक्तव्यामुळे गडकरी आता अडचणीत येण्याची शक्यता आहे.

गडकरींच्या या वक्तव्यांचा परिणाम आगामी निवडणुकांवर होऊ शकतो. आमच्या नागरसेवकाकडे तुमचं काम असल्यास तुम्ही स्वतः त्याच्याकडे जायला हवं, पण नाही. लोकांना असं वाटत कि नगरसेवकांनी स्वतः त्याच्याकडे जावं, असे देखील गडकरी म्हणाले. गडकरींची ही भाषा जनतेला आवडण्यासारखी मुळीच नाही. त्यामुळे जर जनतेने ही वक्तव्य मनावर घेतली तर मात्र भाजपची चांगलीच कोंडी होऊ शकते.

“फोन टॅपिंगच्या घटना फडणवीस असतांना घडल्या, मात्र त्याची किंमत…”, शरद पवारांचा इशारा

पुणे : माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला (Rashmi Shukla) यांच्यावर फोन टॅपिंग केल्याचा आरोप असून यासंदर्भात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे (Sanjay Pande) यांची समिती नेमण्यात आली होती. याच समितीने राज्य शासनाला अहवाल दिल्यानंतर शासनाने दिलेल्या आदेशानुसार त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, हे प्रकरण पुन्हा एकदा चव्हाट्यावर आले असून या मुद्द्यावरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी देखील याविषयी भाष्य केले असून फोन टॅपिंगच्या घटना फडणवीस असतांना घडल्या, मात्र त्याची किंमत आता अधिकाऱ्यांना चुकवावी लागेल, असे पवार म्हणाले आहेत.

महत्वाच्या बातम्या:

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!