Share

भाजप खासदाराने गडकरींना दिली ‘स्पायडरमॅन’ ची उपाधी; नेमके कारण काय?

Published On: 

नवी दिल्ली:  भाजप खासदार तापीर गाओ (BJP MPs Tapir Gao) यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना ‘स्पायडरमॅन’ ची उपाधी दिली आहे. नितीन गडकरींनी देशभरात रस्त्यांचे जाळं उभे केल्याचे सांगताना त्यांनी हे कौतुक केले आहे. ते लोकसभेत एका चर्चासत्रात बोलत होते.

अरुणाचलचे खासदार असणारे तापीर गाओ म्हणाले, “मी नितीन गडकरींचे नाव बदलून स्पायडरमॅन ठेवले आहे. स्पायडरमॅनच्या जाळ्याप्रमाणे नितीन गडकरी देशाच्या कानाकोपऱ्यात रस्त्यांचे विस्तीर्ण जाळे टाकत आहेत. नितीन गडकरी आहेत तर शक्य आहे”. असे तोंडभरून कौतुक त्यांनी केले आहे.

लोकसभेत २०२२-२३ साठी ‘रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाच्या अनुदानाची मागणी’ या विषयावरील चर्चेदरम्यान तापीर गाओ यांनी हे विधान केले आहे. यावेळी त्यांनी मोदी सरकार असताना देशातील संवेदनशील भागांमध्ये आणि खासकरुन भारत-चीन सीमेवर रस्त्याच्या बांधकामाने वेग घेतला तसेच मोदींच्या नेतृत्वात अरुणाचल प्रदेशातील मॅकमोहन लाइनवर दोन पदरी रस्ताही उभा राहत असल्याचेही त्यांनी म्हटले.

महत्वाच्या बातम्या: 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!