Share

IPL 2022: महाराष्ट्राच्या क्रिकेट रसिकांसाठी खुशखबर! आता २५% पेक्षा जास्त प्रेक्षक मैदानावर उपस्थित असणार…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: २६ मार्च रोजी, IPL 2022 चा पहिला सामना चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. दरम्यान, क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. आयपीएलमध्ये,२५ टक्क्यांहून अधिक प्रेक्षक मैदानावर उपस्थितअसू शकतात. बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी याची माहिती दिली आहे. पुढे जाऊन, स्टेडियममध्ये सुरुवातीच्या खेळांपेक्षा जास्त प्रेक्षक असतील. कोरोनाची प्रकरणे दिवसेंदिवस कमी होत असल्याने स्टेडियममध्ये अधिक प्रेक्षक येण्याची अपेक्षा करत असल्याचे सांगण्यात आले आहे.

प्राथमिक अंदाजानुसार, मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये ९,८०० ते १०,००० प्रेक्षक असतील, तर जवळपास २८,००० क्षमतेच्या जवळच्या ब्रेबॉर्न स्टेडियममध्ये ७००० ते ८००० प्रेक्षक असतील. त्याचवेळी नेरुळच्या डीवाय पाटील स्टेडियममध्ये ११ ते १२ हजार प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार आहे. सोबतच पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट स्टेडियम सुरुवातीला १२००० प्रेक्षकांना परवानगी देण्यात येईल. यामुळे क्रिकेट रसिक तब्बल २ वर्षांनी पुन्हा आयपीएलचा प्रत्यक्ष आनंद घेण्यासाठी उत्सुक आहेत.

वेस्ट इंडिज आणि श्रीलंकेविरुद्ध कोलकाता, धर्मशाला, मोहाली आणि बेंगळुरू येथे नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये प्रेक्षकांच्या उपस्थितीबद्दल बोर्डाने समाधान व्यक्त केले आहे. राज्य क्रिकेट संघटनांना लिहिलेल्या पत्रात बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले, “भारतीय संघाने प्रथम वेस्ट इंडिजविरुद्ध आणि श्रीलंका संघाविरुद्धच्या घरच्या मालिकेत क्लीन स्वीप करून चमकदार कामगिरी केली आहे. बेंगळुरू येथील पिंक बॉल कसोटी सामन्यात स्टँड भरले होते आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाने तिन्ही विभागांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकले.”

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!