🕒 1 min read
मुंबई : एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी महाविकास आघाडीसोबत युतीची तयारी दाखवली. त्यामुळे एमआयएम महाविकास आघाडीत येणार का? या चर्चांना उधाण आले आहे. यावर राजकीय क्षेत्रातून अनेक प्रतिक्रिया उमटत असतानाच राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही, असे वक्तव्य केले. दरम्यान, शिंदे यांच्या या वक्तव्यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar) यांनी टीका केली आहे.
यासंदर्भात अतुल भातखळकर यांनी ट्विट केले असून ट्विटमध्ये ते म्हणाले की,’कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही, असे इति मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. महाविकास आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेस-राष्ट्रवादी उपटले तसाच MIM उपटला आहे. एवढं लाजायचं कारण नाही. सराईत आहात तुम्ही’, असे भातखळकर म्हणाले.
'कोण एमआयएम?, कुठून उपटला माहीत नाही' इति मंत्री एकनाथ शिंदे.
महा विकास आघाडी सरकार स्थापन करताना काँग्रेस-राष्ट्रवादी उपटले तसाच MIM उपटला आहे. एवढं लाजायचं कारण नाही. सराईत आहात तुम्ही. pic.twitter.com/M9Ea3JnSQb— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) March 22, 2022
दरम्यान, एमआयएमला ज्या पक्षात जायचं आहे त्या पक्षाचे प्रमुख आणि कार्यकर्ते त्यांना घ्यायला तयार नाहीत. फक्त मला जायचं आहे, मला भेटायचं आहे अस म्हणून कुठल नाटक आहे हे माहित नाही. मात्र एमआयएम सोबत शिवसेनेची युती कधीच होऊ शकत नाही, असेही एकनाथ शिंदे म्हणाले होते.
महत्वाच्या बातम्या
- IPL 2022 : तब्बल ८ वर्षानंतर लीगमध्ये घडणार ‘अशी’ गोष्ट; लखनऊ संघाला मिळाला मान!
- VIDEO: …आणि फलंदाजाने फिल्डिंग टीमची उडवली खिल्ली, असे दृश्य तुम्ही याआधी कधीच पाहिले नसेल!
- VIDEO : तू खरं सोनं आहेस..! ‘मिडनाइट रनर’ प्रदीपच्या संघर्षाला क्रिकेटपटूंनी ठोकला सलाम!
- “ज्यांचे आयुष्य समाजात जातीय तेढ निर्माण करण्यात गेले त्यांनी…”, भातखळकरांची शरद पवारांवर टीका
- “… सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉयच्या सुरक्षेची काळजी घ्यावी”, रोहित पवारांची Zomato कडे मागणी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
