Share

पंकज तडस यांच्याविरोधात महिला काँग्रेसने एसपींना दिले निवेदन; कारवाईची केली मागणी

Published On: 

वर्धा : भाजपचे खासदार रामदास तडस यांचा मुलगा पंकज तडस याच्याविरोधात लैंगिक छळ केल्याची तक्रार पत्नीने पोलिस महानिरीक्षकांकडे केली होती. या तक्रारीमुळे जिल्ह्यात चांगलीच खळबळ माजली आहे. परंतु आता या प्रकरणाला काहीसे वेगळे वळण लागले आहे. याचे कारण म्हणजे राष्ट्रवादी महिला कॉंग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी रामदास तडस यांच्या सुनेनं बनवलेला एक व्हिडीओ ट्वीट केला आहे.

रुपाली चाकणकर यांनी आपल्या स्वत:च्या अकाऊंटवरुन व्हिडीओ ट्विट केला आहे. हा व्हिडीओ भाजपचे खासदार रामदास तडस यांच्या सून पूजा यांचा असल्याचा दावा चाकणकर यांचा आहे. या व्हिडीओतील महिला म्हणते, ‘मी पूजा, रुपालीताई चाकणकर यांना मदत मागतेय, माझ्या जीवाला धोका आहे इथे, मॅडम प्लीज मला इथून घेऊन चला. मी रिक्वेस्ट करते’ असे विनंती त्यांनी केली आहे.

दरम्यान, खासदार पूत्राचा हा प्रकार निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसच्यावतीने निषेध करीत पंकज तडस याच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांना सादर केलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.खासदार पूत्राकडून करण्यात आलेले कृत्य हे अशोभनिय तसेच निंदनिय असून त्याचा महिला काँग्रेसकडून निषेध नोंदविण्यात आला.

महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष हेमलता मेघे यांच्या नेतृत्त्वात पोलीस अधीक्षक कार्यालयासमोर घोषणाबाजी केल्यावर पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांची भेट घेत त्यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. आंदोलनात आशा भुजाडे, अरुणा धोटे, सोनाली कोपुलवार, अर्चना कश्यप, सपना परियाल, जयश्री कटारे, निमा फुलबांधे, शालिनी हर्डीकर, शैला दीक्षित यांच्यासह महिला काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!