Share

विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 टक्के आरक्षण मिळाले पाहिजे; आठवले घेणार मोदींची भेट

Published On: 

मुंबई : विधानसभा आणि लोकसभेत महिलांना 33 आरक्षण देण्याचा कायदा अद्याप प्रलंबित आहे. महिलांना 33 टक्के राजकीय आरक्षण देणारा कायदा संसदेत मंजुर करावा यासाठी आपण लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केले आहे.

महिलांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. महिलांना न्याय मिळाला पाहिजे. महिलांचे शोषण थांबले पाहिजे, समस्त महिला वर्गाला न्याय मिळण्यासाठी रिपब्लिकन पक्ष कटीबद्ध आहे असे आश्वासन रामदास आठवले यांनी दिले आहे. पुढे ते म्हणाले, ‘महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी हिंदू कोड बिल सादर केले. ते हिंदू कोड बिल तत्कालीन सरकारने संसदेत मंजूर केले नाही म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिला होता, असं देखील त्यांनी नमूद केलं आहे.

तर, ‘महिलांच्या न्याय हक्कासाठी भारताचे पहिले कायदा मंत्री असताना महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संकल्पनेतील आमचा रिपब्लिकन पक्ष आहे. रिपब्लिकन पक्ष महिलांच्या न्याय हक्क साठी महिलांच्या बाजूने खंबीरपणे उभा राहणारा पक्ष आहे. विश्वातील कर्तृत्ववान महिलांना न्याय मिळाला पाहिजे’ असे सांगत रामदास आठवले यांनी आज जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा बहाल केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!