Share

‘गुजरातपेक्षा १० रुपयांनी पेट्रोल मुंबईत महाग, आता राज्य सरकारने टीकेचा हक्क गमावलाय’

Published On: 

मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज (दि. 8 मार्च) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. कोरोना काळात राज्याच्या महसुलात मोठी घट झाली असून आपत्कालीन स्थितीतून सावरण्यासाठी राज्याचा खर्च मात्र मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे राज्याच्या तिजोरीतील वित्तीय तूट ही साहजिकच वाढली आहे.

दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पाकडे जनसामान्यांचं लक्ष लागलं होतं. याचं खास कारण म्हणजे पेट्रोल-डिझेलने गाठलेली ऐतिहासिक दरवाढ ! राज्याच्या काही भागात तर पेट्रोल शंभरी पार गेली आहे. यामुळे सामान्यांच्या खिशावरील आर्थिक बोजा वाढत असून राज्य सरकार आपल्या अखत्यारीतील पेट्रोल-डिझेलचा कर कमी करेल का ? या आशेवर होते.

मात्र, अजित पवार यांनी पेट्रोल-डिझेल कमी करण्याबाबत कोणतंही पाऊल उचलेल नाही. अर्थसंकल्पावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना पेट्रोल-डिझेलच्या किंमतीवरून राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. ‘रोज पेट्रोल-डिझेलचा भाव कमी करण्यासाठी सत्ताधारी पक्षाचे आमदार बोर्ड घेऊन येत होते. मात्र त्यांच्या नाकावर टिच्चून राज सरकारने २७ रुप्यांमधील एक नवा पैसा देखील कमी केलेला नाही.’ असं भाष्य देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे.

‘राज्य सरकारला पेट्रोल-डिझेलबाबत बोलण्याचा अधिकारच नाही. कारण गुजरातपेक्षा १० रुपयांनी पेट्रोल मुंबईत महाग आहे. ते केवळ राज्य सरकारच्या करांमुळे महाग आहे.’ असा घणाघात देवेंद्र फडणवीस यांनी केला असून हे अर्थसंकल्प म्हणजेच तेच ते रडगाणं असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!