पुणे : महाराष्ट्र राज्याचा २०२१ -२२ या वर्षाचा अर्थसंकल्प उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार विधानसभेत आज सादर केला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा हा दुसरा अर्थसंकल्प आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार विधानसभेत अर्थसंकल्प सादर करत आहेत तर वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई विधान परिषदेत अर्थसंकल्प सादर करतील.
महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यानंतर हा सरकारचा दुसरा अर्थसंकल्प आहे. कोरोना काळात राज्यातील अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसला आहे. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवारांनी पुणे जिल्ह्याला काय मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. जगभरात सुरू असलेल्या कोरोनाच्या संकटामुळं अर्थव्यवस्था मोडकळीस आली आहे. देशात आणि त्यातही महाराष्ट्रात कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे.
या अर्थसंकल्पातून पुणे-नगर-नाशिक दरम्यान २३५ किमीचा रेल्वे मार्ग उभारण्यात येणार आहे. या पुणे-नाशिक रेल्वे मार्गासाठी १६ हजार १३९ कोटी रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली.
तसेच पुण्यातील ससून रुग्णालयातल्या वर्ग ४ मधील कर्मचाऱ्यांसाठी अनेक दिवसांपासून निवासस्थानाचा मुद्दा चर्चेत आला होता. या निवासस्थानांच्या बांधकामासाठी २८ कोटी २२ लाख अंदाजित खर्चाला मान्यता दिल्याची घोषणा केली. पुण्याबाहेरुन रिंग रोडची उभारणी काळाची गरज आहे. त्यासाठी १७० किमी लांबीच्या २६ हजार कोटी किमतीच्या आठ पदरी रिंग रोड करण्यात येईल. यासाठी भूसंपादनाचं काम याच वर्षी हाती घेण्यात येईल. या रिंग रोडमुळे पुण्यातील ट्रॅफिकची समस्या सुटू शकते, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
देशातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ राज्यात स्थापन करण्यात आले असून, त्याची घोषणा अजित पवार यांनी केली आहे. सध्या पुणे जिल्ह्यात बालेवाडी येथए क्रीडा संकुल सुरू आहे. या क्रीडा संकुलात विविध प्रकारच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. तसेच पुणे शहरात नवीन विमानतळ उभारण्यात येणार असल्याचं पवार म्हणाले. अर्थसंकल्प सादर करत असताना अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली.
महत्त्वाच्या बातम्या :
- पोहरादेवीच्या विकासासाठी पाहिजे तितका निधी देणार-अजित पवार
- मोठी बातमी! महिलांच्या नावाने घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात सवलत, अजित पवारांची घोषणा
- औरंगाबादेत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे अभिनव आंदोलन
- बिदाईला नवरी रडता रडता बेशुद्ध, ऱ्हदयविकाराने जागीच मृत्यू
- भूमाफियांसाठी राज ठाकरे यांनी नाणार बाबतची भूमिका बदलली ?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

