Share

मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या संदर्भातील केसचा तपास NIA करणार

Published On: 

मुंबई- उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या बंगल्याजवळ एक स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळली होती. ही गाडी अंबानींच्या घराजवळ आढळण्याच्या आठ दिवस आधीच चोरीला गेल्याची तक्रार दाखल झाली होती. गाडीच्या मालकाने तक्रार नोंदवली होती.

पोलिसांनी स्फोटकांसह गाडी जप्त केल्यानंतर गाडीचे मालक मनसुख हिरेन यांची चौकशी केली. या चौकशीत सहकार्य करत असलेल्या मनसुख हिरेन यांचा मृतदेह शुक्रवार ५ मार्च रोजी ठाणे जिल्ह्यातील रेतीबंदर येथे आढळला होता.

या घटनेने अवघा महाराष्ट्र हादरून गेला आहे. या मुद्द्यावरून राजकीय कलगीतुरा देखील रंगताना पाहायला मिळत असताना आता अंबानी यांच्या घराजवळ स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळली होती. या प्रकरणाचा तपास एनआयए करणार आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने हा तपास एनआयएकडे सोपवला आहे. विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा तपास एनआयएकडे देण्यात यावा, अशी मागणी केली होती.

तर दुसऱ्या बाजूला ज्या स्कॉर्पिओ गाडीमध्ये स्फोटके आढळली त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या हत्येचा तपास एटीएस करणार आहे. एटीएसने मनसुख हिरेन प्रकरणी पत्नीने केलेल्या फिर्यादीवरुन हत्येचा गुन्हा दाखल केला. गुन्हेगारी स्वरुपाचा कट रचून हत्या करणे आणि हत्या करुन पुरावे नष्ट करणे असेही आरोप एफआयआरमध्ये दाखल केले.

महत्त्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!