मुंबई : महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. राज्याचा अर्थसंकल्प आज (दि. 8 मार्च) उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी सादर केला आहे. महाविकास आघाडीसमोर कोरोना काळामुळे निर्माण झालेल्या आर्थिक तुटीचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. अशातच शेतकरीवर्ग, सर्वसामान्य, महिला आपल्याला काही खास दिलासा मिळणार का ? याची आशा करत होते.
दरम्यान, अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समाधान व्यक्त केलं आहे. ‘कोरोनामुळे आव्हानात्मक परिस्थिती होती पण रडगाणं न गाता सर्व घटकांना दिलासा देणारा आणि राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प आम्ही मांडला आहे,’ असं त्यांनी नमूद केलं आहे.
‘आपल्याला अपेक्षित येणं किती होतं आणि आलं किती? याची आकडेवारी सर्वांना माहिती आहे. अशा स्थितीत सर्व घटकांना दिलासा देत राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प सरकारनं मांडला आहे. त्याबद्दल मी अर्थमंत्री आणि अर्थ राज्यमंत्री यांचे अभिनंदन करतो. कोरोना महामारीमुळं हे वर्ष आव्हानात्मक आहे. कोणतेही रडगाणे न गात जिद्दीने महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही,’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली आहे. तर, ‘महिलांना आपल्या पायावर स्वाभिमानाने उभे करत आहोत. कृषी, शिक्षण, उद्योग या प्रत्येक क्षेत्राला गती देण्याचे काम केले,’ असं देखील ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या :
- ‘गुजरातपेक्षा १० रुपयांनी पेट्रोल मुंबईत महाग, आता राज्य सरकारने टीकेचा हक्क गमावलाय’
- #Maharashtrabudget2021: यंदाच्या अर्थसंकल्पातून पुण्याला काय मिळाले?
- मुकेश अंबानींच्या घराबाहेरील स्फोटकांच्या संदर्भातील केसचा तपास NIA करणार
- जाणून घ्या राज्यात 20 हजार छोट्या सभा, बैठका घेण्यामागे नेमका भाजपचा उद्देश काय ?
- गोसीखुर्द प्रकल्पासाठी १ हजार कोटींची तरतूद, अजित दादांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

