नवी दिल्ली : सध्या दुबईमध्ये आयपीएलचा महासंग्राम सुरु आहे. आयपीएलच्या या मोसमात रंगत वाढली आहे. सर्वच संघ जिंकण्याच्या हेतूने मैदानात उतरत आहेत. तसेच प्रत्येक खेळाडू आपला चमकदार खेळ दर्शवत आहेत. आयपीएलच्या या मोसमात सीएसके फॉर्मात आहे. उत्तम खेळ दर्शवून चेन्नईने प्ले ऑफ फेरीत प्रवेश केला आहे.
दरम्यान, आयपीएलचा फायदा एका न्हाव्याला झाला आहे. हा न्हाव्ही रातोरात करोडपती झाला आहे. अरबिया संग्रामचा रहिवासी अशोक असे या व्यक्तीचे नाव आहे. हा व्यक्ती रातोरात करोडपती झाला आहे. अशोक नावाचा हा न्हाव्ही आपल्या दुकानाबाहेर बसून आपली ड्रीम इलेव्हन टीम तयार करून रातोरात करोडपती झाला. या व्यक्तीला रविवारी जॅकपॉट लागला. या व्यक्तीने पन्नास रुपये गुंतवून आयपीएल सामन्यात चेन्नई विरुद्ध कोलकाता या टीम ची लढत असताना रात्री त्याने ड्रीम इलेव्हनमध्ये संघ बनवला. त्याला माहित नव्हते की त्याने तयार केलेला संघ खरोखर चमत्कार करतील. अशोकने बनवलेल्या ड्रीम इलेव्हनच्या सर्व खेळाडूंनी जबरदस्त कामगिरी केली आणि त्याला ही लॉटरी लागली.
मिळालेल्या माहितीनुसार अशोकला 70 लाख रुपये मिळतील अशोकला यासाठी अधिकृत कॉलही आला आहे. त्याला आयपीएलमधून हा संदेश मिळाला आहे. यामध्ये तीस टक्के रक्कम कापल्यानंतर त्याला 70 लाख रुपये मिळतील. एका गरीब कुटुंबातून आलेल्या अशोकने याची अपेक्षाही केली नव्हती. अशोकचं स्वतःच शेव्हिंगचं दुकान आहे. यावरच तो आपले घर सांभाळतो. ही लॉटरी लागल्यानंतर अशोक ‘आधी कर्ज फेडेल आणि मग घर बांधणार असल्याचे म्हंटले आहे. जेव्हा अशोकला लॉटरी लागली, तेव्हा संपूर्ण रात्र झोपू शकला नाही.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘भाजपालाही काँग्रेसचे टॉनिक लागते, पण हे काँग्रेस नेतृत्वास कधी उमगणार?’
- ‘इथेच पाप केलं तर इथेच पापं भोगावी लागतील’, मनसेचा राष्ट्रवादीला टोला
- वराती मागून घोडे नाचवून काहीच उपयोग नाही; दरेकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल
- ‘अपमान झालाय, आता काँग्रेसमध्ये राहणारच नाही’, अमरिंदर सिंग यांची घोषणा
- ‘मुख्यमंत्री किती मिनिटांचा मराठवाडा दौरा करतात हे पाहावे लागेल’, मनसेचा टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

