औरंंगाबाद : सातारा परिसरात राहणा-या २४ वर्षीय महिलेचा विनयभंग करण्यात आल्याची घटना काही दिवसापुर्वी घडली होती. पीडिता तक्रार देण्यासाठी सातारा पोलिस ठाण्यात गेली असता तेथील कर्मचा-यांनी तक्रार घेण्यास नकार दिल्याने, पीडितेने पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांच्यांकडे तक्रार केली आहे.
सातारा परिसरातील साईनगरात राहणारी २४ वर्षीय पीडित महिला ९ मे रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास आपल्या आई-वडीलांना भेटुन आपल्या घराकडे जात होती. त्यावेळी अजय शिरसाजी गायकवाड (रा.एकता कॉलनी, सातारा परिसर) याने पीडितेला रस्त्यात अडवून तु माझा फोन का उचलत नाही, तसेच मला फोनवर बोलत का नाही म्हणून तिची छेड काढत शारीरिक लगट करीत होता. तसेच पीडितेला चाकूचा धाक दाखवून माझा फोन घेतला नाही तर तुझ्या नव-याला जीवे मारून टाकेन अशी धमकी दिली होती.
यावेळी पीडितेच्या पतीला आणि मावस भावाला देखील अजय गायकवाड याने शिवीगाळ करून मारहाण केली होती. दरम्यान, पीडित महिला सातारा पोलिस ठाण्यात तक्रार घेण्यासाठी गेली असता तेथील कर्मचा-यांनी तु गुन्हेगाराची पत्नी असून तुमची तक्रार घेत नाही असे म्हणून हाकलून दिले असल्याचा आरोप पीडितेने पोलिस आयुक्त डॉ.निखील गुप्ता यांना दिलेल्या निवेदनात केला आहे. तसेच आरोपींवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी देखील या निवेदनात करण्यात आली आहे.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट मात्र मृत्युदर कायम
- अखेर ‘त्या’ वादावर पडदा ; जयंत पाटलांच्या प्रकल्पांना मंजूरी
- पंतप्रधान मोदी उद्या महाराष्ट्रातील १७ जिल्ह्यांतील कोरोनाचा आढावा घेणार
- पुलाखाली आढळला युवकाचा मृतदेह; बोरगावात एकच खळबळ
- बीसीसीआयच्या महिला आणि पुरुष संघातील भेदभावावर हरमनप्रितने टाकला पडदा, दिले ‘हे’ उत्तर
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

