Share

मराठा आरक्षण आंदोलनाचा ३९ वा दिवस; आता शिव संवादातून होणार आक्रोश मेळावा

Published On: 

जालना : अंबड तालुक्यातील साष्टपिंपळगाव येथील मराठा आरक्षण आंदोलन ३९ व्या दिवशी देखील सुरूच आहे. दरम्यान, मराठा आरक्षण आणि मराठा समाजाच्या न्याय्य मागण्यांसाठी येत्या ७ मार्च रोजी साष्टपिंपळगाव येथे राज्यव्यापी आक्रोश मोर्चा होणार आहे. या मोर्चासाठी राज्यभरातून लाखो मराठा आंदोलक साष्टपिंपळगावात दाखल होणार आहे. या जनआक्रोश मेळाव्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.

गेल्या ३८ दिवसांपासून साष्टपिपळगाव येथे मराठा आरक्षणासाठी ठिय्या आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात कुसुम कासुळे, कुसुम सकुंडे, कस्तुरबाई औटे, उषा सुळे, भारती कासुळे, राजूबाई कोळपे, आसराबाई औताडे, मुक्ताबाई ढेपे, गजराबाई औटे, सुलाबाई ढेपे, मालनबाई संकुडे, पार्वताबाई गवळी या महिला मंडळींसह गावातील तरुण, तरुणी ठिय्या आंदोलनाला बसून आहेत. आरणक्ष मिळेपर्यंत हा लढा सुरूच राहणार असल्याचे या आंदोलनकर्त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान, आता ७ मार्च रोजी आक्रोश मेळावा होणार असून या अनुषंगाने प्रत्येक गावांत शिव संवाद मेळावा आयोजित करण्यात येत आहे. यामध्ये विविध जिल्ह्यांतील पदाधिकारी मेळावे घेऊन या दिवशी साष्टपिंपळगाव येथे येण्यासाठीचे नियोजन करीत आहेत. या मेळाव्यांमधून मराठा आरक्षण मिळवण्यासाठी मोठा लढा उभारण्यात येणार आहे.

साष्टपिंपळगावच्या आंदोलनास मुरमा येथे दिला पाठिंबा

जालना जिल्ह्यातील साष्टपिंपळगाव येथे सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घनसावंगी तालुक्यातील मुरमा येथील ग्रामस्थांनी २५ फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाजूला महादेव मंदिरासमोर एक दिवसीय ठिय्या आंदोलन केले.आरक्षणासाठी मराठा समाजाच्या भावना तीव्र असून मराठा आरक्षण लागू करण्यासाठी तत्काळ निर्णय घेण्याची मागणी यावेळी तरुणांनी केली.

मंत्र्यांकडून आंदोलकांची फसवणूक

दरम्यान, सांष्टपिंपळगाव येथे राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि मराठा आरक्षण कृती समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी काही दिवसांपूर्वी भेट दिली होती. त्यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांचे निवदन त्यांच्याकडे सुपुर्द केले होते. मात्र, त्यानंतर शासनाकडून आंदोलकांना कोणताही निर्णय सांगण्यात आला नाही. ही आंदोलकांची फसवणूक असून यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबात समाजात गैरसमज निर्माण होत आहेत, असे आंदोलकांनी म्हटले आहे. राज्य मंत्रीमंडळातील मंत्री मराठा समाजाची चेष्टा करत असून त्याचे परिणाम वाईट होतील असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. आंदोलनाचा उद्रेक होण्यापूर्वी राज्य शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्या, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!