Share

‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ म्हणून पोलिसांवर चाकुहल्ला; छावणीतील घटना

Published On: 

औरंगाबाद : वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपीला थांबवायला गेलेल्या पोलिसांवर ‘तुम्ही नोकरी कसे करता तेच पाहतो’ असे म्हणून पोलिसावर आरोपीने चाकुने हल्ला केला. मात्र वार चुकवल्याने पोलिस वाचले. इतर नागरिकांच्या मदतीने पोलिसांनी आरोपीला जेरबंद करण्यात यशस्वी झाले आहे.

शुक्रवारी पहाटे सकाळी तीन वाजेच्या सुमारास सचिन अशोक भुजबळ हा छावणी येथील चांदमारी मशिदीच्या मागील बाजुला असलेल्या गल्लीत धिंगाणा घालत होता. त्यावेळी सचिनने तिथे उभ्या असलेल्या दुचाकींची तोजफोड केली. याची माहिती गुरुवारी रात्री कर्तव्यावर असलेल्या छावणी बीट मार्शलचे राजू जाधव व सहकारी बाळु पवार यांना मिळाली. त्यांनी तत्काळ तिथे धाव घेतली.

त्यावेळी सचिन मोठमोठ्याने शिविगाळ करत दुचाकींची तोडफोड करत होता. राजु जाधव यांनी त्याला थांबण्यास सांगितले आणि पकडण्याचा प्रयत्न करु लागले. तेव्हा सचिन ने ‘तुम्ही इथे नोकरी कसे करता तेच बघतो,’ असे म्हणत जाधव यांच्या अंगावर धावत गेला व त्यांच्या वर चाकूने हल्ला केला. सचिनने जाधव यांच्या पोटात चाकू घुसवण्याचा प्रयत्न केला. पण जाधव यांनी प्रसंगावधान दाखवत वार चुकवला आणि पुन्हा वार करण्याचा प्रयत्न करताच सचिन ला पकडले. पुढील तपास छावणी पोलिस स्टेशन येथील पथक करत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!