Share

मठात जाऊन येते असे सांगून घरातून घरातून निघालेल्या महिलेचा गोदापात्रात बुडून मृत्यू

Published On: 

नांदेड : हिंगोली जिल्ह्यातील महिलेचा नांदेडमध्ये मरघाट परिसरातील गोदावरीच्या पात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना ४ मार्च रोजी समोर आली. सारजाबाई उर्फ केवळाबाई गोविंदराव चव्हाण असे या ७३ वर्षीय महिलेचे नाव आहे.

सारजाबाई चव्हाण या कळमनुरी तालुक्यातील चिखली येथील रहिवासी आहेत. त्या २७ फेब्रुवारी रोजी दुपारी दिड वाजेच्या सुमारास वाजेगाव येथील आळणी बुवा मठात जाऊन येते असे सांगून घरातून निघाल्या. मात्र, त्या घरी परतल्या नाही. दरम्यान, मरघाट परिसरातील गोदावरी नदीच्या पात्रात ‘त्या’ मृतावस्थेत आढळून आल्या आहेत, अशी माहिती पोलीस ठाणे अंमलदार परमेश्वर कदम यांनी दिली आहे.

मृत महिलेचा पुतण्या उत्तम ग्यानबाराव चव्हाण यांनी ४ मार्च रोजी रात्री दिलेल्या माहिती आधारे नांदेड ग्रामीण ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली. प्रभारी पो. नि. अशोक घोरबांड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक अतुल सातारे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!