Share

जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली; आमदाराची अधिवेशनात ‘दर्दी’ शायरी

Published On: 

जालना : जालना विधानसाभा मतदारसंघाचे आमदार कैलास गोरंट्याल यानी विधानसभेत प्रश्न मांडताना केलेल्या शेरो शायरीने सर्वांचे लक्ष वेधले. जालना नगर परिषदेसह जिल्ह्यातील भोकरदन आणि परतूर अशा तीन नगर पालिका काँग्रेसच्या ताब्यात आहे. या पालिकांना राज्य शासनाने मार्च २०२० मध्ये २९ कोटी ५० लाख रुपयांच्या निधी मंजुर केलेला निधी रद्द करून सदर निधी इतरत्र वळविल्याच्या मुद्दावर आमदार गोंरट्याल यांनी विधीमंडळाच्या अधिवेशनात नगर विकास खात्याच्या कारभारावर आपल्या खास शैलीत टिकेची तोफ डागली.

विद्यमान आमदारांच्या पत्राला नगर विकास खात्याकडून काहीच महत्व दिले जात नाही आणि माजी आमदारांना मात्र भरीव निधी दिला जातो. नगर विकास खात्याचा कारभार नेमका उलटा सुरु असून या पेक्षा दुभाग्य काय असू शकते, अशी खंत आमदार कैलास गोरंट्याल यांनी विधानसभेत व्यक्त केली. तसेच आपल्या खास शैलीत या प्रसंगाला अनुसरुन त्यांनी “जितनी चाहा उतनी मोहब्बत नही मिली, मुनाफेको छोडो लागद भी नही मिली, कातील मेरा कत्ल करके मशहुर हो गया, और मे शहीद होकर भी मुझे शौहरत नही मिली” हा शेर सादर करून त्यांनी निधी वितरीत करतांना होत असलेल्या दुजाभावाबाबद आपली खंत सभागृहात मांडली.

दरम्यान, आमदार कैलास गोरंट्याल यांनी “सभी का लहुल मिला है इस सरकार बनाने में, यह सरकार किसी एक की जहागीर नही है” असा शेर सादर करत नगर विकास खात्याच्या कारभाराकडे त्यांनी विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे लक्ष वेधले. तसेच, “हमारी आवाज से कोई करवट नही बदलता, तुम्ही आवाज दो इस दर्दे दिल को” असा शेर सादर करत झोपेचे सोंग घेणार्‍या नगर विकास खात्याला जागवण्याचे काम करावं, असे आवाहन विधानसभा अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना केले.

महत्त्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!