Share

‘हातात कागद न घेता ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही’

Published On: 

🕒 1 min read

जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजपने देखील आंदोलनाची हाक दिली आहे. सध्या भाजपचे नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत आहेत.

भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे हे आज जळगाव दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारसह मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ‘हातात कागद न घेता उद्धव ठाकरेंना मराठा आरक्षणाबाबत एकही मुद्दा सांगता येणार नाही. तसेच ठाकरे व पवार यांना आरक्षणात रस नसल्याची टीका देखील निलेश राणे यांनी केली आहे.

‘मागास आयोग स्थापन करून मागासलेपणा सिद्ध करावा लागेल हेच ठाकरे सरकारला महिन्यापर्यंत माहीत नव्हते. केंद्राकडे बोट दाखविले जात असले तरी या बाबी राज्य सरकारने पूर्ण केल्या पाहिजे होत्या पण उद्धव ठाकरे आणि अजित पवार यांना यात रस आहे, असे वाटत नाही, या सर्व कारणांमुळेच मराठा आरक्षणाचा विषय अडकला आहे. तसंच, हातात कागद न घेता मुख्यमंत्री ठाकरे यांना यातील एक मुद्दा देखील सांगता येणार नाही,’ असा टोला देखील निलेश राणेंनी लागावला.

महत्त्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!