औरंंगाबाद : रिक्षात गायीचे वासरु चोरुण नेण्याचा प्रयत्न करणाऱ्या शेख कलीम शेख अल्ताफ (वय ४०, रा. फातेमानगर, हर्सुल) याला जमावाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. अटकेत असलेल्या शेख कलीम शेख अल्ताफ याची हर्सुल कारागृहात न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्याचे आदेश प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एस.एम. कादरी यांनी रविवारी (दि.६) दिले.
धनराज भिमराव पालवे (वय ४०, रा. एकतानगर, जटवाडा रोड) हे पीठाची गिरणी चालवतात. तसेच त्यांच्या कडे दहा गाई असून ते दुध विक्रीचा व्यवसाय देखील करतात. ५ जून रोजी सकाळी त्यांच्या ओळखीचे पवन डोंगरे त्यांच्याकडे आले.
त्यांनी हर्सुल जेल समोरील मैदानात तुमच्या गाईचे वासरु चोरणाऱ्या एका रिक्षाच्या क्रमांक ( एमएच-२०-ईएफ-८८१७) चालकाला लोकांनी पकडल्याचे सांगितले. पालवे यांनी मैदानाच्या दिशेने धाव घेत वासरु ताब्यात घेतले. जमावाने रिक्षाचालकाला चोप देत पोलिसांच्या स्वाधीन केले होते. धनराज पालवे यांच्या तक्रारीवरून बेगमपुरा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महत्वाच्या बातम्या
- संभाजीराजेंच्या डोक्यात राजकारण नाही, ते समजदारवृत्तीने आंदोलन करतील – थोरात
- बाहेर लोकांना उपदेश करणाऱ्या बुवाने केली पत्नीला मारहाण; सोशल मिडीयावर व्हिडीओ व्हायरल
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- ‘पहाटेच्या शपथविधीनंतर साहेबांनी घरी घेतलं नसतं, तर तुमची लायकी काय झाली असती?’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

