जळगाव : राज्यात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षणचा मुद्दा चर्चेत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण कायदा रद्द केल्यापासून पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेत आला आहे. न्यायालयाच्या निकालामुळे मराठा समाजात मोठी अस्वस्थता पाहायला मिळत आहे. तर शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे, खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्यासह भाजपने देखील आंदोलनाची हाक दिली आहे. सध्या भाजपचे नेते महाराष्ट्रातील विविध भागांमध्ये जाऊन मराठा आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करत आहेत.
भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे हे आज जळगाव दौऱ्यावर गेले होते. यावेळी त्यांनी पत्रकार परिषदेत महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे ठाकरे सरकारच्या मनात कधीच नव्हते. जाणून बुजून ठाकरे सरकारने सुप्रीम कोर्टात तांत्रिक बाजू मांडल्याच नाहीत. तसेच फडणवीस सरकारने टिकवलेलं आरक्षण बिघडवण्याचा डाव महाविकास आघाडी सरकारने केल्याचा दावा निलेश राणे यांनी केलाय.
‘मराठा आरक्षणाचा घोळ ठाकरे सरकारने केला आहे आणि आरोप केंद्र सरकारवर करीत आहेत. त्यांना हा विषयच समजलेला नाही. ठाकरे सरकारमध्ये या विषयाचा अभ्यास करणारा एकही व्यक्ती नाही. सुप्रीम कोर्टात आवश्यक असलेले संदर्भ, नोंदी सादर केल्याच नसल्याने आरक्षण टिकले नाही. अशोक चव्हाण या समितीमध्ये असल्याने आम्हाला खात्री होतीच की आरक्षण टिकणार नाही, नाकारले जाणार आणि तसेच झाले. हे जाणून बुजून केले गेले याबाबत माझ्या मनात शंकाच नाही,’ असं निलेश राणे म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- हे सरकार म्हणजे कोरोनाच्या महालात झोपलेलं भुताटकीचं सरकार – सदाभाऊ खोत
- व्यापाऱ्यांच्या माथी पुन्हा एकदा आरटीपीसीआर चाचणीचा फार्स, मनपाचे नियोजन शून्य!
- ‘सरकारने घालून दिलेल्या सर्व नियमाचे पालन जनतेने केल्याने कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात येतेय’
- ‘आमच्यावर कारवाई केली, मग ‘त्या; प्रकरणावरून मुख्यमंत्री ठाकरेंवरही गुन्हा दाखल करावा’
- छत्रपती संभाजीराजेंच्या नेतृत्वात होणाऱ्या आंदोलनात भाजप सहभागी होणार; चंद्रकांत पाटलांची घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

