Share

पुण्यात सॅनिटायझर कंपनीला आग, १७ जणांचा मृत्यू ; खासदार सुळेंनी व्यक्त केली हळहळ

Published On: 

पुणे : पिरंगुट एमआयडीसी मधील येथील एका सॅनिटायझर बनवणाऱ्या कंपनीला आज दुपारी भीषण आग लागली. अचानक लागलेल्या आगीमुळे कंपनीत अनेक मजूर अडकून पडले होते. आगीत कंपनीतील काही कामगार बेपत्ता असून १७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न बराच काल सुरु होते.

या घटनेवर बारामतीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. सुप्रिया सुळे यांनी ट्विट केले ‘अतिशय दु:खद! उरवडे,मुळशी येथे एका कंपनीत लागलेल्या आगीत काही कामगारांचा मृत्यु झाला.ही घटना अतिशय वेदनादायी आहे.मृतांना भावपूर्ण श्रद्धांजली.जखमींवर उपचार सुरु असून ते सुखरुप घरी परतावेत ही प्रार्थना, ही घटना समजल्यापासून मी सतत जिल्हाधिकारी, पुणे यांच्या संपर्कात आहे.त्यांच्याकडून मी या संपूर्ण घटनेची सातत्याने माहिती घेत आहे.’ अशा आशयाचे ट्वीट सुळे यांनी केले आहे.

दरम्यान, आग लागलेल्या कंपनीत सॅनिटायजर बनवत असल्याने आगीने तात्काळ रौद्ररूप धारण केले असावे असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. दुपारी अचानक आग लागल्याने बघ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असून जेसीबीच्या साहाय्याने भिंत फोडून कामगारांना सुखरूप बाहेर काढण्याचे प्रयन्त सुरु असल्याचे समजते. आग नेमकी कशामुळे लागली, ते समजू शकले नाही मात्र, आगीची तीव्रता पाहता आतमध्ये मोठ्या प्रमाणात सॅनिटायजर तसेच इतर ज्वलनशील रसायन साठा असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!