मुंबई : मागील काही महिन्यांमध्ये भाजपला विविध राज्यांमध्ये सत्ता स्थापन करण्यात अपयश आले आहे. अशातच, गुजरातमध्ये देखील अचानक मोठी खांदेपालट करण्यात आली. २०२४ च्या लोकसभा निवडणुकांआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व सूत्रे स्वतःच्या हाती घेण्याचे ठरवले असून मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील, असा टोला शिवसेनेचे नेते व खासदार संजय राऊत यांनी सामना अग्रलेखातून लगावला आहे.
सामना अग्रलेखात नेमकं काय म्हटलंय ?
मोदी हाच भारतीय जनता पक्षाचा खरा चेहरा आहे व बाकी सारे फाटके मुखवटे आहेत. मोदींचा चेहरा नसेल तर भाजपातील सध्याचे अनेक नाचरे मुखवटे नगरपालिका निवडणुकांतही पराभूत होतील. मोदी यांना स्वतःचे हे बलस्थान माहीत असल्यामुळेच त्यांनी 2024 च्या तयारीसाठी साहसी पावले टाकायला सुरुवात केली आहे.
तीन राज्यांचे मुख्यमंत्री मोदी-नड्डा जोडीने बदलले. गुजरातमध्ये तर सारी जमीन उकरून किडकी झाडे मुळापासून उपटून टाकली. मध्य प्रदेश, हिमाचल, हरयाणाच्या मुख्यमंत्र्यांवर मोदी-नड्डांचे बारीक लक्ष आहे. मोदींनी गुजरातेत सर्वच बदलले. या धसक्यातून पक्षाला सावरायला वेळ लागेल व हाच प्रयोग त्यांची सरकारे नसलेल्या प्रदेशांतही होऊ शकतो. ”मोदी है तो मुमकीन है” म्हणायचे ते इथे!
भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षपदी डॉ. नड्डा आल्यापासून पक्षात सतत फेरबदल होत आहेत. पंतप्रधान मोदी यांच्या मनात आहे ते डॉ. नड्डा यांच्या माध्यमातून करून घेतले जात आहे. नड्डा यांच्याच माध्यमातून उत्तराखंड व कर्नाटकचे मुख्यमंत्री बदलले गेले. गुजरातचे मुख्यमंत्रीही एका खटक्यात बदलले. तेथे तर संपूर्ण मंत्रिमंडळच नवेकोरे करून टाकले.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल हे प्रथमच आमदार झालेले नेते, पण आता मोदी-नड्डांनी असा धक्का दिला की, राजकारणात काहीच अशक्य नाही. रूपाणी यांच्या मंत्रिमंडळातील सर्व मंत्र्यांना मोदी व नड्डांनी घरी बसवले आहे. ज्या 24 मंत्र्यांनी शपथ घेतली ते सर्व प्रथमच मंत्री झाले. नितीन पटेल यांच्यासह सर्व जुन्या-जाणत्यांना मोडीत काढून मोदी व नड्डा यांनी गुजरातेत नवा डाव मांडला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
- काल मुख्यमंत्र्यांचे सूचक विधान अन् आज जयंत पाटील आणि फडणवीस एकाच गाडीत
- राजकारणात कोणीही कायमचा मित्र किंवा शत्रू नसतो, काहीही चमत्कार होऊ शकतो – विखे
- ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ रुग्णालयात; बॉम्बे हॉस्पिटलमध्ये सुरु आहेत उपचार
- पंजाब कॉंग्रेसमध्ये भूकंप; नेतृत्वाच्या बदलाच्या चर्चांना आले उधाण
- दिवाळीपूर्वीच अनिल देशमुख तुरुंगात जाणार आणि नंतर…; किरीट सोमय्यांचा गंभीर दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

