उस्मानाबाद – गेल्या तीन दिवसांपासून मराठवाड्यासह राज्यातील काही भागात तुफान पाऊस कोसळत आहे. यामुळं जनजीवन विस्कळीत झालं आहे. शेतकऱ्यांचं यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. हजारो हेक्टरवरील पिकं पाण्यात गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.
काही ठिकाणी पिकं सडली आहेत तर सोयाबीन जागेवरच उगवत असल्याचं देखील समोर आलं आहे. या नुकसानीमुळं शेतकरी हवालदिल झाला असून सरकारनं तात्काळ मदत करावी अशी मागणी केली जाऊ लागली आहे. दरम्यान, उस्मानाबाद जिल्ह्याचे पालकमंत्री शंकरराव गडाख यांनी आज पुरग्रस्त भागाच्या नुकसानीची पाहणी केली.
यावेळी त्यांच्या सोबत स्थानिक खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटील हे देखील होते. जिल्ह्यातील पुर परिस्थितीला मोठ्याप्रमाणात झालेला पाऊस कारणीभूत आहे. आम्ही महिनाभराच्या आत नुकसानीचे पंचनामे करुन मदत जाहीर करु अशी माहिती शंकरराव गडाख यांनी दिली. तर गेल्या वर्षीच्या नुकसानाची मदत केंद्रसरकारने दिली नसल्याचा आरोप खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केलाय.
महत्त्वाच्या बातम्या
- नाशिकमध्ये वाहत्या पाण्यात पोहण्याचा मोह तरुणाला पडला चांगलाच महागात
- ‘सिद्धू अहंकारी माणूस आहे, हे पंजाबमधील प्रत्येक मुलाला हे माहित आहे’
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- भावना गवळींना ईडीचे समन्स; 4 ऑक्टोबर रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश
- रिषभचं ‘गली क्रिकेट’ कार्तिकवर पडलं असतं भारी; थोडक्यात बचावला खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

