मुंबई : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांचा मुंबईतील खड्डे पाहणी करत असल्याचा एक व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. विरोधी नेत्यांसह नेटकरी देखील त्यांच्यावर टीका करताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये किशोरी पेडणेकर केवळ नाटक करत असून यामागे कोणतीही काम करून घेण्याची भावना नसल्याचे नेटकरी प्रतिक्रिया देत आहे.
यावर भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी देखील भाष्य करत पेडणेकर यांच्यासह शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ‘मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर किशोरी पेडणेकर यांना बसलेला धक्का आणि त्यातून उसळलेला सात्विक संताप पाहा. बहुधा आयुष्यात प्रथमच त्यांनी खड्डे पाहीले आहेत. किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना?,’ असा सवाल भातखळकर यांनी केला आहे.
मुंबईच्या रस्त्यावरचे खड्डे पाहून महापौर @KishoriPednekar यांना बसलेला धक्का आणि त्यातून उसळलेला सात्विक संताप पाहा. ???? बहुधा आयुष्यात प्रथमच त्यांनी खड्डे पाहीले आहेत.
किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? pic.twitter.com/9tE0BMBhhP
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) September 28, 2021
काय आहे व्हिडीओत ?
किशोरी पेडणेकर चेंबरच्या रस्त्यांवर पोहचल्या होत्या. त्यांच्यासोबत काही वॉर्ड अधिकारीही होते. तिथं मनपा अधिकारी आधीच हजर होते. तेव्हा येथील रस्त्यांची झालेली चाळण पाहून अधिकाऱ्यावर संताप व्यक्त करत आहे. त्याशिवाय हे खड्डे का पडले याचा जाब अधिकाऱ्यांना विचारत आहे. तसेच त्यांनी थेट अधिकाऱ्याची फाईल फेकण्याचा प्रयत्न केला.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- पंजाब काँग्रेसला धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत नड्डा, शहांची भेट घेण्याची शक्यता
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- अबब ! मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने केला तब्बल १५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा दावा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

