नाशिक : शिवसेनेचे आमदार सुहास कांदे यांनी राष्ट्रवादीचे नेते व राज्याचे नागरी अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर नियोजन समितीचा निधी विकल्याचा आरोप केला आहे. याबाबत त्यांनी भुजबळ यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे.
या प्रकरणाच्या चौकशीसाठी कांदेंनी आता थेट न्यायालयातच धाव घेतली आहे. या याचिकेत जिल्हाधिकारी आणि जिल्हा नियोजन अधिकारी यांना देखील प्रतिवादी करण्यात आले आहे. दरम्यान आमदार सुहास कांदे यांनी भुजबळांनी निधी विकल्याचे पाचशे पुरावे असल्याचा दावाही केला आहे. त्यामुळे मंत्री छगन भुजबळ यांच्या अडचणीत वाढ निर्माण होण्याची चिन्हे आहेत.
छगन भुजबळांविरोधात दाखल केलेली याचिका मागे घ्यावी म्हणून शिवसेना आमदार सुहास कांदे यांना अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजन टोळीचा धमकीचा फोन आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून, कांदे यांनी याबाबत पोलिस आयुक्तांना पत्र दिल्याचे समजते. याआधी देखील पुरग्रस्तांच्या मदतनिधीवरून छगन भुजबळ आणि कांदे यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं होतं. त्यांनी महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसचे एकत्र सरकार असताना देखील राष्ट्रवादीचे नेते असलेल्या भुजबळ यांच्याविरोधात आरोप केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
- अश्विनला बाद केल्यानंतर साऊदी आणि मॉर्गनने डिवचलं अन् चिडलेल्या अश्विनने…
- कन्हैया कुमार, जिग्नेश यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड’, ‘भारत बंद’वरून भाजपचे टीकास्त्र
- सातत्याने जावयाचं नाव घेऊ नका, हे काही बरोबर नाही; हसन मुश्रीफ संतापले
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

