शारजाह : इंडियन प्रीमियर लीगच्या 14 व्या हंगामाच्या दुसऱ्या सत्राची धमाकेदार सुरुवात झाली आहे. भारतातील कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयपीएलचा १४ वा हंगाम अर्ध्यावर स्थगित करण्यात आला होता. आता हा हंगाम युएईमध्ये पूर्ण केला जात आहे. दरम्यान, आता क्वालिफाय होण्यासाठी संघांमध्ये चुरस रंगल्याचे पाहायला मिळत आहे. याच चुरशीमध्ये अनेकदा विरोधी संघांमधील खेळाडू एकमेकाला भिडल्याचे पाहायला मिळते.
आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या सामन्यात याचाच प्रत्यय आला. शारजाहवर मोठी धावसंख्या उभे राहत असल्याचे पाहायला मिळते मात्र कोलकात्याच्या दिल्लीला अवघ्या १२७ धावांवर रोखलं. कोलकात्याच्या गोलंदाजांनी दिल्लीच्या ९ गड्यांना बाद केलं. दरम्यान, २० व्या षटकात आर. अश्विन टिम साऊदीच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला.
This what exactly happened in between Ravi Ashwin and Tim southee. ????#KKRvsDC #Ashwin pic.twitter.com/8qEqBizGxO
— JayK | (@Jordankumarr) September 28, 2021
यानंतर अश्विन आणि साऊदी यांच्यात शाब्दिक चकमक उडाल्याचे पाहायला मिळाले. साऊदीने संथ चेंडू टाकला. यावर अश्विन क्रीजच्या बाहेर आला आणि त्याने पुल शॉट खेळला. चेंडू हवेत गेला आणि डीप स्क्वेअर लेगवर उभ्या असलेल्या नितीश राणाने झेल घेतला. दरम्यान, धावा घेताना सौदीने अश्विनला काहीतरी म्हटले. अश्विन हे पाहून चिडला. त्याने मागे वळून उत्तर दिले. तोपर्यंत केकेआरचा कर्णधार मॉर्गनही तिथे आला तोही अश्विनशी भिडला. अशा स्थितीत पंच, कार्तिक आणि पंत यांनी वातावरण शांत केले.
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- कन्हैया कुमार, जिग्नेश यांचा राहुल गांधींच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
- किती नौटंकी करणार शिवसेना? किती चुना लावणार लोकांना? भाजप आमदाराने उडवली खिल्ली
- ‘सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड’, ‘भारत बंद’वरून भाजपचे टीकास्त्र
- अबब ! मुश्रीफ आणि त्यांच्या जावयाने केला तब्बल १५०० कोटींचा घोटाळा; सोमय्यांचा दावा


