मुंबई : केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात राजकीय हेतूने पुकारलेल्या भारत बंदचे आवाहन फज्जा उडवत महाराष्ट्रातील शेतकरी, व्यापारी व सर्वसामान्य जनतेने केंद्र सरकारवर विश्वास व्यक्त केला असा दावा भाजपा किसान मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री आणि माजी कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी केला. तसेच त्यांनी शेतकऱ्यांचे आभार देखील मानते आहे.
यासंदर्भात पत्रकारांशी बोलत असतांना डॉ. बोंडे म्हणाले की,’केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांच्या विरोधात पंजाबच्या काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या राजकीय आंदोलनास महाराष्ट्रातील शेतकऱ्याचा पाठिंबा नाही हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे. केंद्राच्या कायद्याशी सुसंगत असे कृषी कायदे महाराष्ट्रात अस्तित्वात आहेत. त्याने शेतकऱ्यांचे हितरक्षणच होत असल्याचा अनुभव शेतकरी घेत असल्याने या आंदोलनांचा फोलपणा शेतकऱ्याने ओळखला आहे. त्यामुळेच या कायद्यांविरोधातील भारत बंदच्या बेगडी आवाहनास विरोध करून व बंदचा फज्जा उडवून महाराष्ट्रातील शेतकऱ्याने व जनतेने केंद्र सरकारवरील विश्वासाची ग्वाही दिली आहे.’
दरम्यान, पुढे बोलत असतांना ते म्हणाले की,’या कायद्यांच्या विरोधातील भारत बंद आंदोलनास महाराष्ट्रातील सत्ताधारी आघाडीने पाठिंबा दिला होता. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हेही आंदोलनात उतरले होते. मात्र, राज्यात या आंदोलनाचा फज्जा उडाल्याने सत्ताधाऱ्यांच्या दुटप्पीपणाचा मुखवटा उघड झाला आहे. सामान्य जनता सरकारसोबत नसल्याचेही स्पष्ट झाले आहे. शेतकरी हिताच्या विरोधातील कोणत्याच राजकीय कारवाया आता यशस्वी ठरणार नाहीत हेच या फसलेल्या आंदोलनाने दाखवून दिले आहे.’
महत्त्वाच्या बातम्या
- ‘काही दिवसांत अर्धे मंत्रिमंडळ गायब आणि अर्धे रुग्णालयात दाखल झालेले दिसतील’
- पंजाब काँग्रेसला धक्का? कॅप्टन अमरिंदर सिंग दिल्लीत नड्डा, शहांची भेट घेण्याची शक्यता
- ‘माझ्या लग्नातही एवढी मोठी वरात काढली नव्हती’, परळीकरांच्या स्वागताने जयंत पाटील भारावले
- तत्कालीन फडणवीस सरकारच्या ‘जलयुक्त’ घोटाळ्याची खुली चौकशी सुरू
- मुसळधार पावसाचा राज्यात धुमाकूळ; यवतमाळमध्ये एसटी बस वाहून
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

