🕒 1 min read
इचलकरंजी : केंद्र सरकारच्या आणलेल्या नवीन कृषी कायद्याविरोधात दिल्लीत आंदोलन चालू आहे. गेल्या कित्येक दिवसांपासून थंडीत हे आंदोलन शेतकरी करत आहे. केंद्र सरकारने लादलेले जाचक तीन कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी नेते ठाम आहेत. देशभरातून शेतकऱ्यांना समर्थन वाढत आहे. अशात हे कायदे शेतकरी हिताचे असल्याचे सांगणाऱ्यांची देखील संख्या मोठ्या प्रमाणावर आहे.
कृषी कायद्यावरून माजी खासदार व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांचे सुरु असलेल्या आंदोलनावर भाजप नेते आशिष शेलार यांनी जहरी टीका केली आहे. राजू शेट्टींना विधानपरिषदेसाठी दलालांचे तुणतुणे वाजवण्याची वेळ आली आहे, अशी टीका आशिष शेलार यांनी केली आहे. यावरूनच आता शेलार विरुद्ध शेट्टी अशी शाब्दिक चकमक सुरु झाली आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना राजू शेट्टी यांनी शेलारांच्या टीकेला सडेतोड प्रत्युत्तर दिलं आहे. ‘आशिष शेलार यांच्या हातून सत्तासुंदरी गेली आहे. त्यामुळे शेलारसह त्यांच्या टोळक्याची अवस्था भ्रमिष्टा सारखी झाली आहे. भाजप नेत्यांना ध्यानीमनी नुसती सत्ताच दिसत आहे,’ असा पलटवार राजू शेट्टी यांनी केला आहे.
महत्वाच्या बातम्या
- ठरलं तर! राज्य सरकार मुंबईकरांना देणार नव्या वर्षाची भेट, लोकलप्रवास होणार सुरु; वडेट्टीवारांचे सूतोवाच
- ‘मेटेंना सामान्य ज्ञान हवं; मागासवर्गीयांसाठी पुढाकार घेणं म्हणजे इतरांना विरोध असं नाही’
- …नाहीतर विद्यार्थ्यांचं भविष्य टांगणीला लावणार का? वडेट्टीवारांचा संभाजीराजेंना सवाल
- ‘मनसेच्या धमक्यांना आम्ही भीक घालत नाही; संभाजी हे नाव आमच्या हृदयात आहे’
- कचऱ्याचे ढिगारे उचलले नाही तर अधिकाऱ्यांना ठोठावणार दंड- संदीप जोशी
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
