Share

हिंसाचारानंतर ‘बराक ओबामांच’ ट्रम्प समर्थकांना आवाहन तर ट्रम्पवर निशाणा !

Published On: 

🕒 1 min read

वॉशिंग्टन : कोरोना नंतर जगाचे लक्ष वेधले आहे ते अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष निवडणुकीकडे यामध्ये निवडणुकांनंतर लागणाऱ्या निकालाविरोधात डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार जो बायडेन आणि डेमोक्रॅटसवर घोटाळयाचा आरोप करत सर्वोच्च न्यायालयामध्ये धावही घेतली होती.

डोनाल्ड ट्रम्प यांनी आपली हार आणि जो बायडन यांचा विजय अद्यापही पूर्णपणे स्वीकारलेला नाही. तर आता त्यांच्या समर्थकांनी संसदेत धुडगूस घातला आहे.डोनाल्ड ट्रम्प यांचा सपशेल पराभव झाल्यानं त्यांच्या समर्थकांनी संसद भवन आणि व्हाइट हाऊसमध्ये तुफान राडा केला. यावेळी हॉलीवूडच्या एखाद्या थरारक चित्रपटाला शोभेल असे नाट्य अमेरिकन संसदेवर रंगले होते.

त्यांनतर आता या हिंसाचारावर अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डेमोक्रेटिक पक्षाचे बराक ओबामा म्हणाले की, ‘हा हिंसा सध्या राष्ट्राध्यक्ष पदावर असणाऱ्या व्यक्तीने भडवल्याने झाली असून ही व्यक्ती कायदेशीर मार्गाने पार पडलेल्या निवडणुकांबद्दल सातत्याने खोटे आरोप करत आहे. ही घटना आपल्या देशासाठी लज्जास्पद आणि अपमानजनक आहे. ही हिंसा अचानक घडलेली नसून ही चीड अनेक वर्षांपासून खदखदत होती आणि आता ती हिंसेच्या रुपात पाहायला मिळत आहे’. असा ओबामा यांनी फेसबुकवरुन या घटनेचा निषेध करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे.

https://www.facebook.com/barackobama/posts/10158345546981749

‘लोकशाहीच्या सदनामध्ये रिपब्लिकन नेत्यांनी कोणता पर्याय निवडला आहे हे आता दाखवून दिलं आहे. त्यांना याच मार्गाने जायचं असल्यास त्यांनी अशाच हिंसेला प्रोत्साहन देत रहावे किंवा त्यांनी सत्य स्वीकारुन या हिंसेची आग शांत करण्यासाठी पहिलं पाऊल उचलावं. ते अमेरिकेसोबत आहेत असं त्यांनी दाखवून द्यावं’, असं आवाहनही ओबामा यांनी ट्रम्प समर्थक रिपब्लिकन पक्षाच्या नेत्यांना केलं आहे.

अमेरिकन काँग्रेसची बैठक सुरु असतानाच ट्रम्प समर्थक थेट संसदेमध्ये घुसले आणि संसदेत थरार सुरु झाला.आंदोलकांनी इमारतीमध्ये प्रवेश केल्याची माहिती मिळताच कॅपिटॉल इमारतीतील पोलिसांनी मुख्य सभागृहाच्या प्रवेशद्वारांचा ताबा घेतला आणि संसदेवरील हैदोस रोखण्यात आला. यामध्ये पोलिसांनी गोळीबार केला असता एका महिला आंदोलकाचा मृत्यू झाला. तर आता ही संख्या चारवर पोहोचली आहे. दरम्यान हिंसाचार करणाऱ्या ५२ जणांना पोलिसांनी अटक केली आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!