Share

बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला- संजय राऊत

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : भारतातील यशस्वी उद्योगपती आणि हमारा बजाज या जाहिरातीमुळे देशभरात ज्यांचे नाव पोहचले असे बजाज उद्योग समुहाचे प्रमुख राहुल बजाज(Rahul Bajaj) यांचे काल(१३ फेब्रु.) पुण्यात निधन झाले. ते ८३ वर्षाचे होते. गेल्या पाच दशकांमध्ये बजाज उद्योग समूहाला देशभरात आपले पंख पसरावयास राहुल बजाज यांनी मोलाचे मार्गदर्शन केले होते. दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत(Sanjay Raut) यांनी आपल्या आजच्या सामना अग्रलेखाच्या माध्यमातून राहुल बजाज यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

लेखात राऊत म्हणाले आहेत की,‘राहुल बजाज यांच्या निधनाने उद्योग जगतानेच नव्हे तर देशाने एक बेडर आवाज गमावला आहे. बजाज उद्योग समूहाचे ते सर्वेसर्वा. अलीकडेच त्यांनी उद्योगाची सूत्रे दोन्ही मुलांकडे सोपवून निवृत्ती पत्करली होती, पण देशातील घटनांवर त्यांचा आवाज, त्यांची भूमिका यास महत्त्व होते. बजाज हे केवळ उद्योगपती नव्हते, ते सामाजिक जबाबदारी जाणणारे, समाज कल्याणाची जाणीव असलेले उद्योगपती होते. ‘बजाज स्कूटर’च्या माध्यमातून मध्यमवर्गीयांच्या आयुष्याला त्यांनी गती आणली. काही दशकांपूर्वी स्वतःचे वाहन असणे हे मध्यमवर्गीयांचे स्वप्न होते. ज्यांना चारचाकी वाहन घेणे शक्य नव्हते, त्यांच्यासाठी बजाज यांनी ‘चेतक’ स्कूटर आणली.’

दरम्यान, ‘हमारा बजाज’च्या माध्यमातून त्यांनी समस्त मध्यमवर्गीयांना दुचाकीचे स्वार केले. बजाज यांनी इटालियन व्हेस्पाचे ‘चेतक’ या देशी रूपात सादरीकरण केले. ‘चेतक’ हा वीर महाराणा प्रताप यांचा झुंजार घोडा. त्याच ‘चेतक’ नावाने त्यांनी स्कूटर बाजारात आणली. बजाजची चेतक स्कूटर खरेदी करणे हे त्या वेळी हिंदुस्थानातील मध्यमवर्गीय कुटुंबाचे प्रतिष्ठेचे लक्षण बनले होते. ऑटोमोबाईल म्हणजे वाहन क्षेत्रात बजाज उद्योगाने क्रांती केली. बजाज कुटुंबाचे नाते देशाच्या स्वातंत्र्यलढ्याशी होते, असेही राऊत म्हणाले.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!