🕒 1 min read
जळगाव : महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) 10 मार्चनंतर कोसळणार असल्याचा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केलाय. पाटील यांच्या या दाव्यावर आता महाविकास आघाडीचे नेते जोरदार टीका करत आहे. त्यात आता राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी देखील चंद्रकांत पाटील यांना टोले लगावले आहेत.
एकनाथ खडसे (Eknath Khadse) महाविकास आघाडी सरकारबद्दल बोलताना म्हणाले, सरकार पाडण्यासाठी ठोस कारण असलं पाहिजे. विरोधक मनाचे मांडे खात आहेत. जोपर्यंत तिन्ही पक्षाचे बहुमत आहे, तोवर हे सरकार पडणार नाही’, असा दावा खडसेंनी केला आहे. तसेच त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पातीलल यांच्यावर देखील टोलेबाजी केली आहे.
एकनाथ खडसे म्हणाले, चंद्रकांत पाटील हे उत्तम भविष्यकार आहेत. महाविकास आघाडी सरकार पडणार यासाठी त्यांनी अनेकवेळा तारखा जाहीर केल्या आहेत. मात्र चंद्रकांत पाटील सत्तेतून बाहेर पडल्याने ते अस्वस्थ झाले आहेत. सत्तेत नसल्याने त्यांना वन-वन फिरावे लागत आहे. त्यामुळेच ते अशाप्रकारचं वक्तव्य करतात, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे.
महत्वाच्या बातम्या:
- IPL AUCTION 2022: “उसवल गणगोत सार..” ‘चिन्ना थाला’ला चेन्नईचा रामराम!
- किरीट सोमय्या प्रकरणावरुन छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, म्हणाले कि…
- पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
- ‘…तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?’; ओबीसी मुद्द्यावरून अव्हाडांचा सवाल
- काँग्रेसचा पंजाबसाठीच्या जाहीरनाम्यात घोषणांचा पाऊस; मुख्यमंत्री चरणजीत सिंग चन्नी यांनी केली घोषणा
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now
