मुंबई : २०१९ च्या नोव्हेंबर महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या सत्तेवर महाविकास आघाडी सरकार आलं. सत्तेवर आल्यानंतर महाविकास आघाडीने काही महत्वाचे निर्णय घेतले, त्यापैकी एक म्हणजे शिवभोजन थाळी सामान्य लोकांना उपलब्ध करून द्यायचा निर्णय. या शिवभोजन थाळीमध्ये १० रुपयात पोटभर जेवण करायची सोया करण्यात आली आहे.
मात्र या शिवभोजन थाळी केंद्रावर घोटाळा झाल्याचा आरोप अनेक लोकांकडून करण्यात आला आहे. यावर आज प्रतिक्रिया देताना महाराष्ट्र राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री यांनी शिवभोजन थाळी केंद्रावर होणार घोटाळा आजिबात सहन करून घेतला जाणार नाही अशी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. शिवभोजन (Shivbhojan) केंद्रावरील गैरप्रकार खपवून घेणार नाही. शिवभोजन केंद्रांबाबत कोणत्याही प्रकारची तक्रार प्राप्त झाल्यास अथवा कोणतीही अनियमितता आढळून आल्यास संबंधित केंद्रांना प्रथम वेळी कारणे दाखवा नोटीस द्या, दुसऱ्यांदा देखील गैरप्रकार केल्यास मोठ्या रकमेचा दंड करावा आणि पुन्हा तिसऱ्यांदा गैरप्रकार आढळल्यास सदर आस्थापना कायमस्वरूपी बंद करण्याची कारवाई करावी, असे निर्देश अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिले आहेत. यावेळी बोलताना छगन भुजबळ म्हणाले कि, ” महाराष्ट्रामधील सर्वात लोकप्रिय योजनांपैकी शिवभोजन थाळी योजना हि आहे. शहरातील, खेड्यापाड्यातील गरीब लोकांना कमीत कमी किमतीत पोटभरून जेवण मिळावं हे शिवभोजन थाळीचे उद्दिष्ट आहे. सर्वसामान्य गरजू नागरिकांना या योजनेचा लाभ व्हावा, यासाठी शिवभोजन केंद्राची नियमित तपासणी करण्यात यावी.
शिवभोजन केंद्रामध्ये कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार आढळल्यास तातडीने कार्यवाही करा, अशा सूचनाही त्यांनी आज यंत्रणेला दिल्या. राज्यातील काही शिवभोजन थाळी केंद्र ही महिला बचत गटातर्फे चालवल्या जातात त्यामुळे महाराष्ट्रातील महिलांना पण या केंद्रामुळे रोजगार मिळतो असे देखील ते आज म्हणाले.
महत्वाच्या बातम्या :
- किरीट सोमय्या प्रकरणावरुन छगन भुजबळ यांचा मुख्यमंत्र्यांना पाठिंबा, म्हणाले कि…
- पुण्यातील प्रसिद्ध पक्षी अभयारण्य वन विभागाकडे हस्तांतरित होणार; मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
- ‘…तर महाराष्ट्रातील मुख्यमंत्री का ठरवू शकत नाही?’; ओबीसी मुद्द्यावरून अव्हाडांचा सवाल
- ‘…तर मीही अण्णा हजारे सोबत उपोषणाला बसेल’; नवनीत राणा यांचा इशारा
- ‘लबाड लांडगा ढोंग करतंय…’; रूपाली पाटलांचा सोमय्यांना टोला
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

