Share

इंदापूरच्या विकासावरून दत्तात्रय भरणे यांची हर्षवर्धन पाटलांवर टीका, म्हणाले कि…

Published On: 

🕒 1 min read

पुणे : पुणे जिल्ह्याच्या राजकारणात अनेक विधानसभा जागांवरून बऱ्याच वेळा खटके उडताना दिसतात. अशीच पुणे जिल्ह्यातील एक राजकीय दृष्ट्या महत्वाची जागा म्हणजे इंदापूर विधानसभेची जागा होय. या जागेवरून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि विद्यमान मंत्री दत्तात्रय भरणे आणि पूर्वाश्रमीचे काँग्रेस नेते व  विद्यमान भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील या दोघांमध्ये सतत खटके उडत असतात.

२०१४ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस हे दोन पक्ष स्वतंत्र्य निवडणूक लढले होते. या निवडणुकीत इंदापूर विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे यांनी त्याकाळी काँग्रेसमध्ये असणाऱ्या हर्षवर्धन पाटील यांचा प्रथम पराभव केला होता. त्यानंतर २०१९ मध्ये पण झालेल्या निवडणुकीमध्ये दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता.

हर्षवर्धन पाटील आणि दत्तात्रय भरणे यांच्यात सतत खटके उडत असतात. आज राज्याचे मंत्री दत्तात्रय भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर ”इंदापूर” शहराच्या विकासावरून पुन्हा टीकेची झोड उडवली आहे. दत्तात्रय भरणे हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीका करताना म्हणाले कि, ” इंदापूरचा विकास करणे येड्या गबाळ्याचे काम नाही, जनाची नाही तर मनाची लाज वाटली पाहिजे. असे म्हणत त्यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यावर टोला लगावला आहे. माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Harshwardhan Patil) हे गेली सात वर्षे झाले निवांत आहेत, त्यांनी असेच निवांत रहावे, आम्ही केलेल्या विकास कामाचे श्रेय घेऊ नये, इंदापूर तालुक्याचा विकास करणे हे येड्या गबाळ्याचे काम नाही, उगाच आम्ही केलेल्या विकास कामांचे श्रेय घेऊ नये, त्यामुळे यांना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे असे राज्यमंत्री भरणे (Datta Bharne) यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील (Bjp) यांचे नाव न घेता टीका केली, इंदापूर तालुक्यातील कौठळी या गावी विविध कामांचे उद्घाटन राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी भरणे बोलत होते.

महत्वाच्या बातम्या : 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!