मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजानी तुफान फटकेबाजी करत कोलकाता नाइट रायडर्स समोर २२१ धावांचे लक्ष्य ठेवले. या सामन्यात चेन्नईने २०० धावांचा टप्पा ओलांडताच केकेआरच्या नावे एक आयपीएलच्या इतिहासातील एक नकोसा विक्रम झाला आहे. विरोधी संघाला २०० पेक्षा जास्त धावा देण्याच्या यादीत केकेआरने चेन्नईच्या संघाची बरोबरी केली आहे. दोन्ही संघानी या विरोधी संघाला १२ वेळेस २०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत.
या यादीत पंजाबचा संघ हा पहिल्या स्थानावर विराजमान आहे. पंजाबच्या संघाने तब्बल २१ सामन्यात विरोधी संघाला २०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. त्याखालोखाल दुसऱ्या क्रमांकावर आरसीबी संघ आहे. आरसीबीने १७ वेळा विरोधी संघाला २०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. तर दिल्लीने १४ वेळा विरोधी संघाला २०० पेक्षा जास्त धावा दिल्या आहेत. तर चेन्नई आणि केकेआर हे संयुक्तपणे १२ वेळा विरोधी संघाला २०० पेक्षा धावा देण्याच्या यादीत चौथ्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या
- उस्मानाबादेत आजपासून ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित, ३५० रुग्णांना मिळेल ऑक्सिजन
- ‘नानाजी, हवे तर प्रियांका गांधी यांचा सल्ला घ्या, पण महाराष्ट्राला वाचवा हो’
- ‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला
- शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर
- शतक न करताच प्लेसिस बनला ‘हा’ विक्रम करणारा केवळ चेन्नईचा केवळ दुसराच खेळाडू
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

