Share

‘त्या रिकाम्या जागेत तू नेहमीच जिवंत राहशील बाळा’, पंकजा मुंडेंच्या पोस्टने सोशल मीडिया गहिवरला

Published On: 

बीड : कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट बनत चालली आहे. अनेकांच्या जवळच्या व्यक्ती मृत्यूमुखी पडत आहेत किंवा मरणाच्या दारात उभ्या आहेत. अनेक नेतेमंडळी, सेलिब्रिटींना कोरोनानं ग्रासलं आहे. सामान्यांची अवस्था तर चहुबाजूंनी मार पडत असल्यासारखी झाली आहे.

कोरोनामुळे अनेकांच्या जवळच्या व्यक्तींचे निधन झाल्याच्या घटना आपण रोजच ऐकत आहोत. पंकजा मुंडे यांनी देखील एक भावुक पोस्ट शेअर करत त्यांच्या अंगरक्षक भावचं निधन झाल्याची माहिती दिली आहे. कोरोनामुळे मोठा फटका मुंडे कुटुंबाला बसला आहे. गोविंद मुंडे यांच्या निधनानंतर पंकजा मुंडे यांनी भावुक पोस्ट शेअर करत याबाबात माहिती दिली आहे. त्यांच्याबरोबर एक व्हिडीओ शेअर करत पंकजा मुंडे यांनी लिहिलं आहे की, ‘गोविंद.. एक जागा कायम रिकामी झाली..’ या व्हिडीओमध्ये त्यांनी गोविंद यांच्याबरोबच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत.

तसेच फेसबूकवर पोस्ट लिहून गोविंद हे त्यांचे अंगरक्षक कसे झाले, पंकजांची काळजी कशी घेतली, सुख-दु:खात कशी साथ दिली हे सांगितले. ‘काही नाते आपल्या आयुष्यात एक जागा भरतात आणि ती पूर्णपणे रिक्तही करतात…जी कधीच भरू शकत नाहीत. मोठमोठया डोळ्यांचा, चुणचुणीत, पहिलवान टाईप हा गोविंद..२००९-१० च्या जिल्हा परिषद निवडणुकीत आमच्या आयुष्यात आला. माझ्या गाडीवर हल्ला झाला होता, निवडणूक हिंसक वळण घेत होती. ५-६ जण सतीश, गोविंद, अंगद, गंगा, प्रल्हाद, सुरेश हे माझ्याकडे आले. बाकी जण कमी बोलायचे पण गोविंद, म्हणाला, आम्हाला तुमचं अंगरक्षक व्हायचयं. तुमचे ‘भाऊ’ म्हणून तुमच्यामागे रहायचं आहे. आम्हाला जिथे जाल तिथे जेवण द्या बस.. बाकी काही नको.

https://www.facebook.com/PankajaGopinathMunde/posts/3935224913229707

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!