Share

शेतकरी कुटुंबातून आलेल्या अभिमन्यू काळेंची बदली अतिशय चुकीची; शिवसेना नेत्याचा घरचा आहेर

Published On: 

पुणे : महाराष्ट्रासह देशभरात कोरोना रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत आहे. महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांचा उद्रेक झाला असून या लाटेत आरोग्य यंत्रणेवर मोठा ताण निर्माण झाला आहे. रुग्णांना बेड्स मिळत नाहीयेत. राज्यात ऑक्सिजन, रेमडेसिविर इंजेक्शन आणि इतर आवश्यक औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शनचा मोठा तुटवडा निर्माण झाल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा राजकीय आरोप-प्रत्यारोपांचा सामना देखील रंगला आहे. अशातच, काल एफडीए कमिशनर अभिमन्यू काळे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. रेमडेसेवीर इंजेक्शन उत्पादक कंपन्यांकडून उपलब्ध करून घेण्यात आलेल्या अपयशामुळे बदली करण्यात आली आहे. काळे यांच्यानंतर परिमल सिंग यांच्याकडे एफडीए आयुक्त पदाची सूत्रे सोपवण्यात आली आहे.

काळेंवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मंत्रिमंडळ बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री नवाब मलिक आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली होती. दरम्यान, आता शिवसेना नेते व माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी मात्र ही बदली चुकीची असल्याचे ट्विट करून महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे.

‘राज्यातील रेमडिसिव्हर इंजेक्शनच्या टंचाईचे खापर अन्न व औषध प्रशासन आयुक्त अभिमन्यू काळे यांच्यावर फोडण्यात येऊन त्यांची तडकाफडकी करण्यात आलेली बदली अतिशय चुकीची व निषेधार्थ आहे. अभिमन्यू काळे यांना मी अतिशय जवळून ओळखतो. राजकीय हितापेक्षा लोकहीत नजरेसमोर ठेऊन त्यांनी नेहमीच आपल्या पदाला योग्य न्याय दिला आहे. त्यामुळेच त्यांना न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा म्हणून बदलीला सामोरे जावे लागले असून हे बाब अतिशय दुर्दैवी आहे.’ असं आढळराव पाटील म्हणाले आहेत.

यासोबतच, ‘मराठमोळ्या शेतकरी कुटुंबातील एक प्रामाणिक आणि कष्टाळू अधिकाऱ्याच्या केलेल्या तकडफडकी बदलीला माझा ठाम विरोध असून जनसेवेसाठी अखंड काम करणाऱ्या या कार्यकुशल अधिकाऱ्यास माझा जाहीर पाठिंबा आहे,’ अशी भूमिका देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांनी स्पष्ट केली आहे.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!