मुंबई : आयपीएलमध्ये बुधवारी झालेल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाइट रायडर्सवर १८ धावांनी मात करत विजयाची हॅटट्रिक साजरी केली. चेन्नईने दिलेल्या २२१ धावांचा पाठलाग करताना केकेआरचा संघ २०२ धावांवर सर्वबाद झाला. या विजयासह चेन्नईने गुणतालीकेत पहिल्या स्थानी झेप घेतली आहे.
या सामन्यात चेन्नईच्या फलंदाजानी केकेआरच्या फलंदाजाचा खरपुस सामाचार घेतला. पहिल्या गड्यासाठी सलामीवीर ऋुतराज गायकवाड आणि डु प्लेसीस यांनी ११५ धावांची भागिदारी केली. ऋतुराज बाद झाल्यानंतर डु प्लेसिसने मोईन अली आणि कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांच्यासोबत संघाचा डाव सावरत संघाला २०० धावांच्या पार नेले. यादरम्यान डु प्लेसिसने ९५ धावांची नाबाद खेळी केली. डावातील शेवटच्या षटकात प्लेसिसला शतकासाठी आखेरच्या दोन चेंडुवर सहा धावांची गरज होती. मात्र पाचव्या चेंडुवर केवळ एकच धाव घेता आल्याने प्लेसिसचे शतक अपुर्ण राहिले.
मात्र डुप्लेसीस शतकापासुन जरी वंचित राहिला तरी नव्वदीत नाबाद राहणारा तो चेन्नईचा केवळ दुसरा खेळाडू बनला आहे. या आधी सुरेश रैना ९९ धावावर नाबाद राहिला होता. सुरेश रैनाने ही कामगीरी हैदराबाद विरुद्ध केली होती. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सने कोलकाता नाईट रायडर्स संघावर १८ धांवानी मात केली आहे.
महत्वाच्या बातम्या
- पंतप्रधानांच्या भाषणातून ऊर्जा मिळेल असे वाटले होते पण… शिवसेनेचा मोदींवर निशाणा
- राजस्थानचा श्रेयस गोपाल करतोय भारतीय दिग्गज गोलंदाजांची नक्कल; व्हिडीओ व्हायरल
- तुम्ही रुग्णांच्या बाबतीत हलगर्जीपणा करत आहात, न्यायालयाने ठाकरे सरकारला फटकारले
- विनाकारण फिरणाऱ्या अकरा जणांचे अहवाल पाॅझिटिव्ह, जालन्यात पोलिसांच्या कारवाईला सुरुवात
- जिल्हांतर्गत तसेच जिल्ह्याबाहेरही एसटी सुरु राहतील, पण…; परिवहन मंत्री अनिल परब यांची माहिती
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

