Share

थोडा प्रयत्न केला तर जे पक्ष सोडून गेले ते आजही पक्षात येऊ शकतात : जितेंद्र आव्हाड

Published On: 

कल्याण : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढविण्यासाठी इथल्या अनेकांनी प्रचंड मेहनत घेतली. अनेकांनी खस्ता खाल्ल्या तेव्हा कुठे इथे पक्ष उभा राहिला. ज्यांनी पक्ष उभा केला ते आज पक्षात दिसत नाही. त्यांच्या मनात चुकीचं होतं असं नाही मात्र त्यांचं म्हणणं ऐकून घेतलं गेलं नाही म्हणून ते सोडून गेले असं गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हटले आहे.

कल्याण-डोंबिवली विधानसभा मतदारसंघातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधताना आव्हाड यांनी हे मत व्यक्त केले आहे. पुढे बोलताना ते म्हणाले, आपण थोडा प्रयत्न केला तर जे पक्ष सोडून गेले ते आजही पक्षात येऊ शकतात. नवे-जुने पदाधिकारी मिळवून या पक्षाला आपण पुन्हा सुगीचे दिवस आणू शकतो. मला खात्री आहे की तो दिवस लवकरच उजाडेल असा विश्वास जितेंद्र आव्हाड यांनी व्यक्त केला. आजच कल्याण – डोंबिवली शहरातील पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी पहिले पाऊल टाकले आहे. लवकरच इथला पाण्याचा प्रश्न सुटेल. मी माझ्या गृहनिर्माण विभागामार्फतही काही योजना आणेन असे सांगतानाच आपला शत्रू भाजप आहे, आपण भाजपच्या चुकीच्या धोरणाविरोधात लोकांचे प्रबोधन करा असे आवाहन मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शिंदे, माजी खासदार आनंद परांजपे, प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, उल्हासनगर मनपा गटनेता भरत गंगोत्री, निरीक्षक माया कटारिया, महिला जिल्हाध्यक्षा विद्या वेखंडे, आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!