Share

जे गेले त्यांच्याबाबत अश्रू ढाळून काही अर्थ नाही – जयंत पाटील

Published On: 

नवी मुंबई : जे गेले त्यांच्याबाबत अश्रू ढाळून काही अर्थ नाही. आपण समोर असलेल्या परिस्थितीचा सामना करायचा आहे आणि जिद्दीने पुन्हा हे शहर राष्ट्रवादीमय करुया असा आत्मविश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांमध्ये निर्माण केला. काल नवी मुंबई येथे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

मला कल्पना आहे की अचानक येऊन पडलेल्या जबाबदारी मुळे आपल्या सर्वांना काय अडचणींचा सामना करावा लागत आहे. कुणीही पक्ष सोडून गेला तरी पक्ष कार्यकर्ता कायम पक्षासोबत उभा राहतो हे आपण मागच्या कालखंडात अनुभवले आहे. त्यामुळे संघटना मजबूत करा, प्रत्येक कार्यकर्त्याला बळ द्या. मला खात्री हे शहर पवारसाहेबांच्या विचारांवरच विश्वास टाकेल असा विश्वासही जयंत पाटील यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जो मान मिळत होता तो आता मिळतोय का ? इथला प्रत्येक निर्णय स्थानिक नेत्यांना विचारात घेऊन व्हायचा मात्र आता दिल्ली म्हणेल तेच होईल. कोणताही मान नाही असा टोला गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता गणेश नाईक यांना लगावला आहे.

काळ आणि वेळ पाहून लोक बदलत असतात त्याप्रमाणे २०१९ साली अनेक लोक पक्ष सोडुन गेले. पवारसाहेबांना सोडून अनेकजण गद्दार झाले. सर्वाधिक गद्दारी नवी मुंबईतील नेत्याने केली. या लोकांना पवारसाहेबांनी बाजूची खुर्ची दिली मात्र पक्ष सोडताना त्यांनी याची दखल घेतली नाही असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले. भाजपने देशाची परिस्थिती बदलून टाकली आहे, आज महागाई प्रचंड वाढली आहे. घर कसं चालवायचे याचा अनुभव नसल्याने महागाई वाढवली जात आहे. महागाईची सर्वाधिक झळ ही महिला वर्गाला बसली आहे त्यामुळे महिलांनी संघर्षाला सुरुवात करायला पाहिजे असेही जितेंद्र आव्हाड म्हणाले.

यावेळी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी खासदार आनंद परांजपे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक प्रशांत पाटील, प्रदेश सरचिटणीस भालचंद्र नलावडे, मच्छिमार संघटनेचे अध्यक्ष चंदू पाटील, जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, कार्याध्यक्ष जी.एस पाटील, युवक जिल्हाध्यक्ष किशोर आंग्रे, महिला जिल्हाध्यक्षा प्राजक्ता मोंडकर, युवती जिल्हाध्यक्षा श्वेता खरात, ऐरोली युवक निरीक्षक नारायण खरजे, प्रदेश चिटणीस रहेमान सय्यद, युवती निरीक्षक प्रियंका सोनार आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!