Share

ऑक्टोबरमध्ये पेट्रोल-डिझेल ५ रुपयांपेक्षाही जास्त दराने महागले

Published On: 

नवी दिल्ली: देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीनं उच्चांक गाठले आहेत. इंधन दरवाढीमुळे केंद्र सरकारवर सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत 20 हून अधिक वेळा इंधनदरात वाढ झाली आहे. हे दर असेच वाढत राहिल्यास लवकरच पेट्रोलचा दर 120 रुपये होईल यात काही शंका नाही. मात्र आज ट्रोल-डिझेल दरात वाढ झालेली नसून किमती स्थिर आहेत.

ऑक्टोबरमध्येच पेट्रोल 5.15 रुपयांपेक्षाही जास्त दराने महाग झाले आहे, तर डिझेलही जवळपास 5 रुपयांनी वाढले आहे. कच्च्या तेलाच्या किंमती वाढत असताना, पेट्रोल आणि डिझेलचे दरही सातत्याने वाढत आहेत. देशाच्या अनेक शहरांमध्ये यावेळी पेट्रोल दर 120 लीटरच्या जवळपास पोहोचला आहे.

दरम्यान, सततच्या वाढत्या किमतीमुळे मध्यप्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्रप्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक, तामिळनाडू, केरळ, बिहार आणि पंजाब यांच्यासह 15 राज्यांमध्ये पेट्रोलच्या किमती आधीच शंभरी पार पोहोचल्या आहेत. तर डिझेलने देखील काही भागात शंभरी गाठली आहे.

इंडियन ऑइलच्या वेबासाइटनुसार, RSP बरोबर आपल्या शहराचा कोड टाइप करून 9224992249 नंबरवर SMS पाठवा.या शहराचा कोड वेगवेगळा असतो. बीपीसीएल ग्राहक RSP लिहून 9223112222 आणि एचपीसीएल ग्राहक HPPrice लिहून 9222201122 या नंबरवर मेसेज पाठवून पेट्रोल आणि डिझेलच्या किमती जाणून घ्या.

 

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!