जयपूर: राजस्थानमधील राजकीय पेचप्रसंगामुळे कॉंग्रेसची चिंता वाढली आहे. यासह राज्यात राजकीय हालचाली वाढल्या आहेत. मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी आज रात्री जयपूरमध्ये कॉंग्रेसचे आमदार आणि मंत्र्यांची बैठक बोलावली आहे.
राज्यामध्ये गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यामध्ये बेबनाव सुरू असल्याच्या वृत्ताच्या पार्श्वभुमीवर या सर्वजणांनी गेहलोत यांना पाठिंबा दर्शवला आहे. तर पायलट यांचे निकटवर्तीय असलेले कॉंग्रेसमधील काही आमदार दिल्लीला रवाना झाले असल्याचे समजते आहे. या आमदारांमध्ये राजस्थान कॉंग्रेस अध्यक्षांचाही समावेश आहे.
राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी आमदारांसोबत दिल्ली गाठली. यामुळे गेहलोत सरकार अडचणीत आलंय. यासाठीच आता सरकार वाचवण्यासाठी मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आमदारांनाच हजर होण्याचा आदेश दिला आहे.
‘मुख्यमंत्री गेहलोत यांनी काँग्रेसच्या आमदारांना असाल तिथून निघून या आणि जयपूरला पोहोचा, असे आदेश दिलेत. ज्यांना शक्य असेल त्यांनी मला भेटण्यासाठी मुख्यमंत्री निवासस्थानी यावं,’ असंही आमदारांना कळविण्यात आले आहे.
कॉंग्रेसमधील नाराज नेत्यांमुळे सरकार अस्थिर झाले असताना कॉंग्रेसकडून भाजपवर अनेक गंभीर आरोप करण्यात येत होते. या सर्व प्रकरणावर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी चिंता व्यक्त केली आहे. घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? असा थेट सवाल सिब्बल यांनी विचारला आहे. तसेच राजस्थानमधील पक्षाच्या स्थितीबद्दल काळजीत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
Worried for our party
Will we wake up only after the horses have bolted from our stables ?
— Kapil Sibal (@KapilSibal) July 12, 2020
कपिल सिब्बल म्हणाले, ‘घोडे तबेल्यातून फरार झाल्यावरच आपण जागणार आहोत का? पक्षाच्या स्थितीबद्दल काळजी वाटत आहे.’ राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपवर राज्य सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला आहे. भाजप राजस्थान काँग्रेसचे आणि इतर काही अपक्ष आमदार 10-15 कोटी रुपये देऊन खरेदी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे.
दरम्यान,भाजपाकडून सरकार पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केल्यानंतर आता भाजपने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. काँग्रेसने भाजपावर आरोप करु नये, त्याऐवजी त्यांनी आपले घर संभाळावे” असे भाजपा नेते ओम माथुर यांनी म्हटले आहे. राज्यात सत्तेवर आल्यापासूनच अशोक गेहलोत सरकार अडचणीत आहे असे माथुर म्हणाले. इंडिया टुडेने हे वृत्त दिले आहे.
“मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांच्यातील अंतर्गत संघर्षामुळे राजस्थानातील काँग्रेस सरकारमध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे. हे सत्य स्वीकारण्याऐवाजी गेहलोत भाजपाला जबाबदार ठरवत आहेत” असे माथुर यांनी सांगितले.
महत्वाच्या बातम्या-
सध्याचे मुख्यमंत्री हे घरात बसून केवळ आदेश देण्यात मग्न आहेत- आठवले
#DilSeThankYou : रात्रंदिवस काम करणार्या पोलिसांचे अक्षय कुमारने मानले अनोख्या पद्धतीने आभार
प्रकृती ठणठणीत असून मी क्वारंटाइन असल्याचे वृत्त खोटे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
‘पुढून, मागून कसंही पाहिलं तरी गडी पैलवान काय वाटतं नाही’
परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळ, आता तरी HRD आणि युजीसीला पटेल का?
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

